MPSC मार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागात 137 जागांसाठी भरती

Published On: जून 18, 2025
Follow Us

MPSC Excise Sub Inspector Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक (गट-क) पदाच्या 137 जागांसाठी भरती निघालीय, ही पदभरती राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
जवान संवर्ग: 115 पदे
लिपिक संवर्ग: 22 पदे
दिव्यांग प्रवर्गासाठी: 6 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि निकष
राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान आणि लिपिक संवर्गातील कर्मचारी अर्ज करू शकतात.
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असलेल्या उमेदवारांसाठी 3 वर्षांची नियमित सेवा आवश्यक.
माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्षांची नियमित सेवा पूर्ण असणे बंधनकारक.

ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 30 जून 2025, रात्री 11:59 वाजता
चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 3 जुलै 2025

कसे असेल परीक्षेचे स्वरूप?
परीक्षेचा टप्पा:
फक्त एक टप्पा (लेखी परीक्षा).
परीक्षेचा प्रकार: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा.
गुण: एकूण 200 गुण (दोन पेपर).
निवड प्रक्रिया: लेखी परीक्षेतील अंतिम गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now