वडिलांचा आदर्श घेत लेकीने वर्दीचे स्वप्न बघितले अन् धाडसाने पूर्ण केले ; वाचा प्रियांकाचा हा यशस्वी प्रवास…

Published On: जानेवारी 2, 2024
Follow Us

MPSC PSI Success Story : घरातील लेक प्रगतीचे पाऊल टाकत असेल तर सारं घर शिक्षित होतं. तसंच वडिलांच्या पाठोपाठ प्रियांकाने देखील पोलीस खात्यात नोकरी मिळवली. ही आई – वडिलांसाठी अभिमानाची बाब होती. प्रियंकाचे वडील रामसिंग बैस हे देखील गोंदिया पोलिस दलात कार्यरत आहेत.पोलीस खात्यात नोकरी करत असलेल्या पोलिस शिपायाची मुलीने एमपीएससी परीक्षा पास करत पीएसआय होण्याचा मान मिळविला आहे.

गोंदिया शहराच्या फुलचूर भागात राहणाऱ्या प्रियंका बैस. तिचे सारे शिक्षण याच भागात झाले.लहानपणापासूनच वर्दीची नोकरी मिळावी हे स्वप्न तिने पहिले असून त्याची तयारी देखील प्रियंकाने वयाच्या २१ व्या वर्षी सुरु केली.

शालेय जीवनात असताना तिने आंतराष्ट्रीय रग्बी खेळाडू म्हणून तिने जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तिला वडिलांचे मार्गदर्शन तर मिळालेच…एका वाचनालयात बसून तिने अभ्यास करत हे यश संपादन केले आहे. तसेच तिला खेळाची पण प्रचंड आवड असल्याने एमपीएससी परीक्षेत यश संपादन करत स्पोर्ट कोट्यातून विदर्भात पहिला तर राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे.‌ इतकेच नाहीतर प्रियंका बैस या तरुणीने २३व्या वर्षी PSI होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय मित्रांनो, स्वप्नांचा पाठलाग करत राहिले तर एक ना एक दिवस यश हे मिळतेच.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025