⁠  ⁠

कुठल्याही क्लासविना शेतकरी कन्याची PSI पदाला गवसणी..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC PSI Success Story : फलटण तालुक्यातील चव्हाणवाडी येथील शेतकरी कन्या प्रियांका अविनाश चव्हाण यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी परिक्षेत चांगले गुण मिळवून पीएसआय पदाला गवसणी घातली आहे. हे तिचे यश ग्रामीण भागातील कित्येक तरूणांना दिशा दाखवणारे आहे.

प्रियांकाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चव्हाणवाडी येथील शाळेत झाले. उच्च माध्यमिक शिक्षण लोणंद येथील शाळेत झाले आहे. पुणे येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथून त्यांनी कृषी पदवी प्राप्त केली आहे. आई-वडिलांच्या लहानपणापासून शिक्षणासाठी मिळालेले प्रोत्साहन आणि भक्कम पाठिंब्याच्या जोरावर मेहनत केली. गावात राहून मैदानी सराव तर केलाच पण अभ्यासाचे नियोजन देखील केले.

चव्हाणवाडी सारख्या खेड्यातून अतिशय खडतर परिस्थितीतून शिक्षण मिळवतं, तसेच कुठल्याही कोचिंग क्लासेसला न जाता स्वयंअध्ययानावर करत हे यश प्रियांका चव्हाण यांनी मिळवले आहे.

Share This Article