⁠
Study Material

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा भाग – १

state-forest-service1

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन २०१७ च्या अंदाजित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २४ सप्टेंबर २०१७ रोजी घेण्यात येणार आहे. मागील लेखात आपण महाराष्ट्र वनसेवा परीक्षेचे टप्पे, पूर्वपरीक्षेचे स्वरूप, आवश्यक शैक्षणिक अर्हता व शारीरिक पात्रता यांची माहिती घेतली. आज आपण वनसेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिकांचे मुद्देसूद विश्लेषण करू आणि त्या अनुषंगाने अभ्यासाचे नियोजन कशा प्रकारे आखता येईल ते पाहू.

* मुख्य परीक्षेचे स्वरूप
* मुख्य परीक्षा – ४०० गुण
* प्रश्नपत्रिकांची संख्या – दोन

१. सामान्य अध्ययन

२. सामान्य विज्ञान आणि निसर्ग संवर्धन

state-forest-service-exam

परीक्षा योजना

वनसेवा मुख्य परीक्षेतील पेपर २ ची विभागणी आयोगाने वरीलप्रमाणे दोन घटकांत केलेली आहे.

अभ्यासक्रम

* पेपर क्रमांक १

सामान्य अध्ययन

१. भारताचा इतिहास, महाराष्ट्रावर अधिक भर

२. देशाचा आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आíथक भूगोल, महाराष्ट्रावर अधिक भर.

३. भारतीय राज्यसंस्था व शासन, घटना आणि राजकीय प्रणाली, ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था.

४. आर्थिक आणि सामाजिक विकास

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

* पेपर क्रमांक २

सामान्य विज्ञान आणि निसर्ग संवर्धन

मुख्य परीक्षा पेपर क्र. २ चे माध्यम केवळ इंग्रजी असते याची नोंद परीक्षार्थीनी घ्यावी.

१. सामान्य विज्ञान (जनरल सायन्स)-भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र

२. निसर्ग संवर्धन (नेचर कॉन्झव्‍‌र्हेशन) – २.१ मृदा – मृदेचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैवशास्त्रीय गुणधर्म. प्रक्रिया आणि मातीनिर्मितीचे घटक, मृदेच्या उत्पादकतेत त्यांची भूमिका, मातीचे प्रकार, मातीसंबंधित समस्या आणि त्यात सुधारणा.
माती आणि ओलावा टिकणे – जमिनीची धूप होण्याची कारणे, नियंत्रणाची पद्धत. वनांची भूमिका, पाणलोट व्यवस्थापन वैशिष्टय़े आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी उचलावी लागणारी पावले.

२.२ पर्यावरणीय व्यवस्था – प्रकार, अन्नसाखळी, अन्नजाळी, पर्यावरणीय पिरॅमिड, ऊर्जेचा प्रवाह, कार्बन आणि नायट्रोजनचे जैवरासायनिक चक्र

खते – सेंद्रिय आणि रासायनिक वनस्पती आणि प्राण्यांचे आजार.

कीटकनाशके, इजा होऊ शकतील अशा वनस्पती आणि तण.

२.३ पर्यावरणीय प्रदूषण – प्रकार, नियंत्रण, निर्देशक आणि धोक्यात आलेल्या प्रजाती.

उत्खनन आणि खाणकामासंबंधित पर्यावरणीय समस्या.

ग्रीनहाऊस इफेक्ट, कार्बन ट्रेिडग, पर्यावरणीय बदल.

२.४ देशातील महत्त्वाची जंगली श्वापदे –

गुरांच्या जाती, चारा आणि गवताळ प्रदेश व्यवस्थापन, कुरणांचे अर्थशास्त्र.

२.५ देशातील महत्त्वाच्या स्थानिक वृक्षांच्या जाती, विदेशी वनस्पती, वनस्पती-उत्पादनांचा स्रोत. उदा. अन्न, फायबर, जळाऊ लाकूड, इमारतीसाठीचे लाकूड

इत्यादी, वन उत्पादन, औषधी वनस्पती, ऊर्जा लागवड, खारफुटी, वनआधारित उद्योग.

वनस्पतीच्या वाढीवर आणि वितरणावर परिणाम करणारे घटक. भारतातील वनांचे प्रकार.

२.६ राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये, जागतिक वारसा वास्तू –

सामाजिक वनीकरण, वन व्यवस्थापन, शेती वनीकरण.

भारतीय वन धोरण, भारतीय वन कायदा, वन्य जीव संरक्षण कायदा, वन संवर्धन कायदा. १९८०.

निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था.

२.७ हवाई छायाचित्रे, कल्पनात्मक नकाशे, उपग्रह चित्रे यांचा वापर. ‘जीआयएस’चे तत्त्व आणि उपयोजन.

जैवविविधता, जैवविविधतेच्या ऱ्हासाची कारणे, जैवविविधतेच्या संवर्धनाचे महत्त्व.

वनस्पती प्रजनन, उती, आदिवासी आणि वने, देशातील महत्त्वाच्या जमाती.

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नजरेखालून घातल्यास दिसून येते की, पेपर क्रमांक १ या सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय स्वातंत्र्य चळवळ, सामाजिक सुधारणा, जगाचा आणि भारताचा (त्याअनुषंगाने महाराष्ट्राचा) प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल, भारतीय राज्यघटना आणि स्थानिक स्वराज्य संस्था, देशाचा आíथक आणि सामाजिक विकास या घटकांवर आयोगाने भर दिला आहे.

पेपर क्रमांक २ (सामान्य विज्ञान आणि निसर्ग संवर्धन) चा अभ्यासक्रम हा साहाय्यक वनसंरक्षक- गट अ (अउा) व वनक्षेत्रपाल- गट ब (फाड) या पदांना पूरक असा निर्माण करण्यात आला आहे. या पदांवर कार्य करताना आवश्यक असणारे ज्ञान व कायद्याच्या अनुषंगाने घ्यावे लागणारे निर्णय यांचा योग्य समन्वय पेपर क्र. २ मध्ये साधण्यात आला आहे.

पुढील अंकात आपण २०१४ व २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करू व त्यातील उपघटकांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे मुद्देसूद विवेचन करू.

हे देखील वाचा –
१. महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा

२. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा भाग – २

हा लेख महेश कोगे यांनी दैनिक लोकसत्ताच्या करिअर वृत्तान्त या सदरात लिहला आहे. तेथून साभार.

[quote arrow=”yes”]विद्यार्थी मित्रांनो यानंतरही तुमचे काही प्रश्न असल्यास खालील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ‘मिशन एमपीएससी’ टीमद्वारे तुमच्या शंकांचं निरसन करण्यात येईल. नियमित अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC[/quote]

Related Articles

One Comment

Check Also
Close
Back to top button