---Advertisement---

महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा

By Tushar Bhambare

Updated On:

state-forest-service
---Advertisement---

state-forest-service

मित्रहो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन २०१७ मध्ये आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक अलीकडेच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसारित केले आहे. त्यानुसार २०१७ ची महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा ४ जून २०१७ रोजी पार पडणार आहे. मुख्य परीक्षा २४ सप्टेंबर २०१७ रोजी घेण्यात येईल. म्हणून पुढील दोन लेखांमध्ये आपण ‘महाराष्ट्र वन सेवा परीक्षेद्वारे’ केल्या जाणाऱ्या नेमणुकीविषयी, अभ्यासक्रमाविषयी व आवश्यक पात्रतेविषयी माहिती घेऊ.

---Advertisement---

महाराष्ट्र लोकसवा आयोगाद्वारे वन सेवा विभागातील साहाय्यक वन संरक्षक गट अ (ACFY) व वनक्षेत्रपाल – गट ‘ब’ (RFO)या पदांसाठी एकाच परीक्षेद्वारे निवड केली जाते. अंतिम गुणवत्ता यादीतील गुणांच्या आधारे वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल अशी उमेदवारांची नेमणूक होते.

परीक्षेचे टप्पे –

१) पूर्वपरीक्षा – १०० गुण २) मुख्य परीक्षा – ४०० गुण ३) मुलाखत – ५० गुण

परीक्षेचे स्वरूप – पूर्वपरीक्षा

आवश्यक पात्रता –
१. शैक्षणिक अर्हता – वनस्पतिशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्याशास्त्र, कृषिशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अ‍ॅप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यापकी कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक आहे.

विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवारास विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता :-
डोळ्याची दृष्टी तीक्ष्णता (व्हिज्युअल अक्विटी) ६/६ असावी. पुरुष व महिला उमेदवारांमध्ये अनुक्रमे २५ कि.मी. व १४ कि.मी. अंतर ४ तासांत चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे.

पूर्वपरीक्षा –
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वनसेवा पूर्वपरीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम १/१०/२०१५ रोजी त्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेला आहे.

अभ्यासक्रम :-
१) मराठी भाषा
२) इंग्रजी भाषा
३) जागतिक, भारतातील चालू घडामोडी
४) बुद्धिमत्ता आणि अंकगणित.

पूर्वपरीक्षेचे विश्लेषण –
२०१४ च्या वन सेवा परीक्षेचे विश्लेषण केल्यास वरीलप्रमाणे प्रश्न आयोगाचे विचारल्याचे आपल्याला दिसून येते; पण २०१६च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सामान्यविज्ञान हा घटक पूर्वपरीक्षेतून वगळण्यात आला आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार वरील चार घटकांवर सम प्रमाणात प्रश्न विचारले असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे कोणत्याही घटकाकडे दुर्लक्ष न करता प्रत्येक घटकाच्या अभ्यासाला समप्रमाणात वेळ परीक्षार्थीनी द्यावा.

२०१४ व २०१६ च्या पूर्वपरीक्षाच्या निकालाचे विश्लेषण करावयाचे झाल्यास प्रामुख्याने असे नमूद करणे योग्य ठरेल. जास्त प्रश्न सोडविण्याच्या ओघात परीक्षार्थीना निगेटिव्ह गुणांचा फटका बसला आहे. त्यामुळे स्वत: परीक्षार्थीनी प्रश्नपत्रिकेचे सूक्ष्म विश्लेषण करावे व सखोल अभ्यास आणि प्रश्नपत्रिकांचा सराव यावर भर द्यावा. सुधारित अभ्यासक्रमानुसार २०१६च्या पूर्वपरीक्षेमधील मराठी या घटकामध्ये वाक्यांचे प्रकार, शब्दांच्या जाती, एखाद्या शब्दाबद्दलचा उपलब्ध असणारा शब्दसमूह, समानार्थी विरुद्धार्थी शब्द याबद्दल प्रश्न विचारलेले दिसतात, तर इंग्रजी या घटकात Direct Indirect Speech, Identify the Correct Sentence, Clauses या उपघटकांवर भर दिलेला आहे.

अभ्यासाचे नियोजन –
मराठी व इंग्रजी या विषयांचे व्याकरण व उताऱ्यांचा सराव दररोज करावा.
बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या घटकास दिवसातून किमान दोन तास द्यावेत.
चालू घडामोडी या घटकासाठी परीक्षार्थीनी दररोज किमान एक मराठी व इंग्रजी वर्तमानपत्र वाचून स्वत:चे टिपण तयार करावे.

संदर्भ साहित्य सूची

१) मराठी भाषा –
सुगम मराठी व्याकरण – मो.रा. वाळिंबे
मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे
संपूर्ण मराठी – के सागर प्रकाशन

२) इंग्रजी भाषा –
English Grammer – Wern & Martin
English Grammer – Pal & Suri
संपूर्ण इंग्रजी – के सागर प्रकाशन

३) बुद्धिमत्ता व अंकगणित –
बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित – आठवी, नववी, दहावी, एम.टी.एस.ची पुस्तके, क्वांटिटेंटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड – आर.एस. अगरवाल, रिझिनग – आर. एस. अगरवाल.

४) चालू घडामोडी –
योजना, लोकराज्य मासिके, करंट ग्राफ वार्षकिी, एखादे आघाडीचे इंग्रजी व मराठी दैनिक.

state forest service 1

state forest service 2

state forest service 3

state forest service 4

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेची माहिती आपण पुढील अंकात घेऊ.

#हे देखील वाचा :
१. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा भाग – १
२. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा भाग – २

हा लेख महेश कोगे यांनी दैनिक लोकसत्ताच्या करिअर वृत्तान्त या सदरात लिहला आहे. तेथून साभार.

[quote arrow=”yes”]विद्यार्थी मित्रांनो यानंतरही तुमचे काही प्रश्न असल्यास खालील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ‘मिशन एमपीएससी’ टीमद्वारे तुमच्या शंकांचं निरसन करण्यात येईल. नियमित अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC[/quote]

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

3 thoughts on “महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा”

Comments are closed.