⁠  ⁠

गजाननचे MPSC च्या परीक्षेत नेत्रदीपक यश !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story : लहानशा गावात शेतकरी कुटुंबात जडणघडण झालेला वसमत तालुक्यातील धामणगाव येथील गजानन चंपतराव हरबळे.गजानन यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्यांनी पुणे येथे आपली तयारी सुरु ठेवली.

जिद्द, चिकाटी, अनुभव आणि स्वयंअध्ययनाच्या जोरावर त्यांनी उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करून दाखवले.गजानन यांनीही तोच दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आपणही पोलीस उपनिरीक्षक बनून समाजाची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते.

अगोदर त्यांची मंत्रालयात लिपिक म्हणून निवड झाली होती. पण त्याला वर्दीचे आकर्षण होते. त्यासाठी त्याने अभ्यासासोबतच मैदानी सराव देखील केला.राज्यातील पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात २०२० मध्ये जाहीर झाली होती. त्याची पूर्व परीक्षा २०२१ ला, मुख्य परीक्षा २०२२ ला झाली. शारीरिक परीक्षा फेब्रुवारीत तर मुलाखत मार्च मध्ये होऊन त्याचा निकाल जुलै २०२३ मध्ये जाहीर झाला. यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२० मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या परीक्षेचा प्रलंबित ईडब्लूएस (आर्थिक दृष्ट्या मागास) प्रवर्गातील निकालात यश मिळाले.

यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव झाला. त्याचा हा प्रवास गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर होतकरू मुलांना नक्कीच त्यांच्यापासून प्रेरणा मिळेल.

Share This Article