⁠  ⁠

चहाच्या‎ हॉटेलसह बांधकाम‎ ठेकेदाराकडे केलं काम ; आता जिद्दीच्या जोरावर MPSC मारली बाजी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC कडून दरवर्षी विविध पदांवर भरती घेली जाते. यात विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत घेत असतात. यात काहींना यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा. दरम्यान, कौटुंबिक कलह आणि आर्थिक‎ परिस्थिती बेताची असूनही चहाच्या‎ हॉटेलवर आणि बांधकाम‎ ठेकेदाराकडे काम करून शिक्षण पूर्ण करीत बांधकाम‎ विभागात वर्ग दोनची नोकरी‎ मिळवली. त्यानंतर आता‎ एमपीएससीतून वर्ग १ च्या‎ अधिकारीपदी निवड झाली. अंगावर‎ शहारे आणणारी ही जिद्दीची कथा‎ आहे, कापडणे येथील तरुण गणेश‎ माळी यांची…‎ MPSC Success Story

गणेश माळी यांची घरात गरिबीची परिस्थिती असल्याने‎ इयत्ता चौथीमध्ये शिकत असताना‎ चहाच्या हॉटेलवर तीस रुपये रोजाने‎ काम केले.यात घरात आई व‎ वडिलांचा कौटुंबिक वाद अस्वस्थ‎ करत होता. अशा परिस्थितीत‎ मधील काळात शिक्षण सुटले, मात्र‎ चहा हॉटेलवर काम करीत असताना‎ गावातील माध्यमिक शाळेत गणेश‎ माळी हे गेले असता उदय पाटील,‎ सतीश पाटील या शिक्षकांनी त्यांच्या‎ अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी‎ त्यांच्या वडिलांची भेट घेऊन‎ गणेशचे शिक्षण पुन्हा सुरू केले.‎ शिक्षण सुरू झाले पण कालांतराने‎ कौटुंबिक कलाहने आई कुटुंब‎ सोडून निघून गेली.

यामुळे‎ त्यांच्यासह व लहान बहीण संगीता‎ मनाने खचली. वडील काशिनाथ‎ माळी यांनी दोन्ही लेकरांना कवेत‎ घेत रात्रंदिवस काम करून‎ गणेशच्या शिक्षणाला प्रोत्साहन‎ दिले. लहान बहिणीने शिक्षणासह‎ घरकाम सांभाळले. कापडणे येथे‎ गणेश व वडील काशिनाथ माळी हे‎ मिळेल ते काम करू लागले. यात‎ बांधकामासह प्रत्येक काम ते करू‎ लागले.

मात्र जास्ती काम करूनही‎ पुरेशे पैसे मिळत नसल्याने त्यांनी‎ नाशिक गाठले. याठिकाणी एका‎ बांधकाम व्यावसायिकाकडे‎ वॉचमनचे काम करीत त्याच‎ ठिकाणी पत्र्याच्या दहा बाय दहाच्या‎ खोलीत जीवनप्रवास सुरू होता. या‎ काळात गणेशने आपले माध्यमिक‎ शिक्षण नाशिक शहरातच पूर्ण केले.‎ २०१९ साली जलसंपदा विभागात ‎ क्लास २ ची जागा मिळवली. पुढे ‎ पुन्हा अभ्यासक्रम अविरत ‎ ठेवल्यामुळे गणेश माळी यांनी ‎ अखेर सार्वजनिक बांधकाम ‎ विभागात क्लास १ ची जागा ‎मिळवत यश प्राप्त केले. ‎ लवकरच ते नवीन पदावर रुजू ‎ होणार आहेत. ‎

Share This Article