⁠  ⁠

पाच वर्षे कठोर मेहनत करत ऋषिकेश झाला क्लास वन अधिकारी !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story : उत्तम करिअर आणि नोकरी करतानाच सामाजिक सेवा करण्याची संधी मिळते या विचाराने ऋषिकेशने स्पर्धा परीक्षा देण्याचे आणि अधिकारी व्हायचे स्वप्न उराशी बाळगले. त्यानुसार त्याने तयारीला सुरुवात केली. याच जिद्दीने रत्नागिरीच्या ऋषिकेश शेखर सावंतने एमपीएससी राज्य सेवा मुख्य परीक्षेत (२०२२) ५७६ गुणांसह महाराष्ट्रात ६३वा क्रमांक मिळवला आहे.

ऋषिकेशचे शालेय शिक्षण पटवर्धन हायस्कूलमध्ये झाले. तर उच्च शिक्षण हे फिनोलेक्स अकॅडमी येथील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्समधून २०१४ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याने नोकरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

त्यानुसार त्याने काही काळ नोकरीसुद्धा केली; परंतु चार वर्षात नोकरी सोडून एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली.त्याने स्मार्टस्टडीवर भर दिला. परीक्षा कशी असते, त्यानुसार अभ्यास केला. पहिल्या परीक्षांतील चुकांतून शिकलो. काहीवेळा अपयशही आले. काही चुका पुन्हा पुन्हा झाल्या पण त्या सुधारत पुढे चालत राहिला.सुरुवातीला दिवसाला ४ तास व पुढे पुढे १२ तासांपर्यंत अभ्यास करत होतो.

पुस्तके वाचनावर भर दिला. परीक्षेच्या काळात १० ते १२ तास अभ्यास केला. प्रत्येक परीक्षेसाठी खूप अभ्यास केला. स्पर्धा परीक्षा अवघड असली तरी करोना काळ, आरोग्य, कौटुंबिक, आर्थिक समस्यांवर मात करत त्याने हे यश मिळवले. आई-वडिलांची प्रेरणा, मित्र आणि नातेवाइकांचे प्रोत्साहन नेहमी मिळत गेले. त्यामुळेच त्याची प्रथम वर्ग सरकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे .

Share This Article