नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे नोकरीची संधी, 35,000 रुपये पगार मिळेल

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पदाचे नाव 

१) सीनियर रिसर्च फेलो 
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच पीसीआर, क्लोनिंग, टिश्यू यामध्ये अनिभव असणं आवश्यक आहे.

२) ज्युनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. RNA आयसोलेशन आणि पीसीआर, क्लोनिंग, टिश्यू यामध्ये अनिभव असणं आवश्यक आहे.

३) प्रोजेक्ट असोसिएट 
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. संबंधित विषयांमध्ये अनुभव आवश्यक.

४) प्रोजेक्ट असिस्टंट
शैक्षणिक पात्रता  : उमेदवारांनी विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. संबंधित विषयांमध्ये अनुभव आवश्यक.

वयाची अट : १५ नोव्हेंबर २०२१ रोजी २८ ते ५० वर्षे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

पगार : 

सीनियर रिसर्च फेलो – 35,000/- रुपये प्रतिमहिना + HRA

ज्युनियर रिसर्च फेलो – 31,000/- रुपये प्रतिमहिना + HRA

प्रोजेक्ट असोसिएट- 28,000/- रुपये प्रतिमहिना + HRA

प्रोजेक्ट असिस्टंट – 20,000/- रुपये प्रतिमहिना + HRA

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी : [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021

अधिकृत संकेतस्थळ :  www.nccs.res.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Leave a Comment