PMC Recruitment 2025 : पुणे महानगरपालिकेअंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, पुणे महानगरपालिकेद्वारे ही भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख ९ जुलै २०२५ पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : १२
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) समुपदेशक- 11 पदे
शैक्षणिक पात्रता : 1) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्टर ऑफ सोशल वर्कची (MSW) पदवी उत्तीर्ण. 2) एच.आय.व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान 3 वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 1 जागा
शैक्षणिक पात्रता : 1) मान्यता विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (बी.एस.सी.) व डि.एम.एल.टी. उत्तीर्ण 2) एच.आय.व्ही. रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जाहिरातीच्या दिनांकास किमान वय 18 पूर्ण असावे व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा 5 वर्षे शिथिल राहिल. उमेदवारांनी जन्म तारखेच्या पुराव्यासाठी जन्म तारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांन्त परिक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख : ९ जुलै २०२५
अर्ज कुठे कराल?
पात्र उमेदवारांनी पुणे शहर एड़स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, 1 ला मजला, 663, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे 411002 येथे (शासकीय सुट्टी वगळून) सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत समक्ष अर्ज सादर करावयाचा आहे.
अधिकृत संकेतस्थळ : http://www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा







