⁠  ⁠

राज्यसेवा मुलाखत तयारी भाग-१

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 9 Min Read
9 Min Read

डॉ. अजित प्रकाश थोरबोले

[icon type=”vector” icon=”momizat-icon-quotes-left” size=”32″ hover_animation=”border_increase” ]राज्यसेवा मुख्य परीक्षेतून मुलाखतीला पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांचे प्रथमतः अभिनंदन आणि मुलाखतीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा.

preparation-for-rajyaseva-interview1

# राज्यसेवाच्या मागील वर्षातील मार्काचा आणि मिळालेले पदांचा विचार करता मुलाखती मधील गुण हे तुम्हाला कोणते पद मिळणार हे ठरवत आहे. त्यामुळे मुलाखतीची तयारी चांगली करा.

# पुर्व परीक्षा आणि मुख्य परिक्षा या दोन पेपरमध्ये तुमची ज्ञानाची कसोटी अगोदरच चेक केली आहे. मुलाखत ही तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे हे लक्षात असु द्या.

# मुलाखतीचे वेळापत्रक पण आले आहे. आपल्याला मुलाखतीच्या दिनांकानुसार तयारीचे नियोजन करा.

# मुलाखत ही बोलण्याची परीक्षा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बोलण्याचा सराव करा. वाचणापेक्षा बोलणे जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कोणताही प्रश्न घ्यायचा आणि स्वतःशी तुमच्या मित्राशी, तुमच्या शिक्षकांशी याबाबत उत्तर सांगायचा प्रयत्न करा

#मुलाखती २२ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत. काही जणांचे Interview जवळ आले आहेत. Preparation साठी इतरांपेक्षा कमी वेळ मिळणार आहे. म्हणून घाबरून, अस्वस्थ वाटुन घेऊ नका. Personality Test ही तुमच्या व्यक्तिमत्वाची कसोटी आहे. आयुष्यभर तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते. त्यातून तुमची तयारीच होत असते. त्यामुळे घाबरून जाऊ नका
.

# मुलाखतीची तयारी करताना प्रथम तुमचा Biodata चांगला Prepare करा.  त्यामध्ये…
१]तुमचे गाव – वैशिष्ट्ये, समस्या, समस्येचे सोडवणूक
२]तुमचा जिल्हा – वैशिष्ट्ये, समस्या, समस्येचे सोडवणूक
३]आई-वडिलाबद्दल माहिती
४]तुमची शैक्षणिक पार्श्वभुमी
५]पदवीबद्दलची सद्य स्थिती
६]सदया करत असलेला Job
७]तुमचे छंद , आवड

वरील सर्व विषयाबाबत चालू घडामोडीबाबतची माहिती

मला विचारले गेलेले Biodata वर अधारीत प्रश्न
१]तुम्ही कोठून आलात ?
२[तुमचे 11 वी 12 वीला विषय कोणते होते ?
३]BAMS ला कोणते विषय होते?
४]सोलापूर जिल्ह्याची पर्जन्यक्षमता किती आहे ?
५]सोलापूर जिल्ह्याची सिंचनक्षमता किती आहे ?
६]पर्जन्यवृष्टी कमी असताना सिंचन क्षमता जास्त का?
७]वडिल काय करतात ?
८]Forensic science च्या काही term विचारल्या
९]सध्या काय करता?
१०]UPSC च्या मुलाखती संदर्भात काही प्रश्न विचारले

.
# मुलाखतीमध्ये मोठ्या प्रमाणावर factual प्रश्न विचारले जातात. त्या सर्वच प्रश्नांची उत्तरे यायलाच हवी असे काय नाही. कधी कधी तुम्हाला comfort करण्यासाठी असे प्रश्न विचारले जातात. तुमच्या knowledge ची परीक्षा अगोदरच झालेली आहे याचे भान असावे.
उदा. मला माझ्या मुलाखतीमध्ये I.C.S. या परिक्षेचा longform विचारला होता? या प्रश्नाचे उत्तर मला देता आले नाही.

# मुलाखतीबाबत कोणताही दबाव न घेता आत्मविश्वासपुर्वक सामोरे जावा. थोडीसी भिती सहाजिक आहे. परंतु त्याचा परिणाम होऊ देऊ नका. अधिकारी हा कितीही मोठे संकट/अडचण आली तर त्यांना सामोरे जाणारा असायला हवा.

# मुलाखतीपर्यत आपण एक अधिकारी आहात या भावनेने रहा. त्यापध्दतीने तुमचे बोलणे, वागणे, राहणे असायला हवे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. तुमची Body Language बनते. उस्फुर्तपणे इतरांशी बोला. Formal dress वापरा. इतरांशी नम्रतापूर्वक सवांद साधा .

# तुम्ही जे Preferences टाकलेले आहेत.ते काळजीपूर्वक टाका आणि त्याचा क्रम तुम्हाला माहित असायला हवा. त्याचप्रमाणे त्याच क्रमाने का टाकले? याचे उत्तर देता आले पाहिजे? उदा. काही जण DySp हे पद Deputy Collector या पदा अगोदर टाकतात तर प्रथम का ते दिले ? हे सांगता आले पाहिजे.

# चालु घडामोडीवर अधारीत मुलाखतीला प्रश्न विचारले जातात. ते बऱ्यापैकी तुमचे मत जाणून घेण्याकरिता विचारले जातात. त्याचप्रमाणे ते विषय माहित आहेत का हे पण त्या द्वारे पहिले जाते . अशा प्रश्नांची थोडक्यात उत्तरे देता आली पाहिजेत. ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या प्रश्नाबाबत मत विचारले असते तेंव्हा तुम्ही अशा प्रश्नांची उत्तरे देणे टाळणे चुकीचे आहे. तुम्ही त्यावर तुमचे मत प्रकट करून ते कसे बरोबर आहे सांगायला हवे.
उदा. साहित्याकांनी मिळाले अवार्ड परत करणे चुकीचे आहे का? तुमचे मत काय ? अशा प्रश्नांना तुम्ही होय किंवा नाही या दोन्ही प्रकारे उत्तरे देऊन उत्तराचे समर्थन करू शकता. तुम्ही दिलेले उत्तर हे चूक अथवा बरोबर नसून तुम्ही कशा पध्दतीने विचार करता हे तपासले जाते.

# मुलाखतीमध्ये तुमची नेतृत्वक्षमता, कार्यतत्परता, आत्मविश्वास , प्रामाणिकपण, निर्णय घेण्याची क्षमता, सामाजिक जाणीव,देशाबद्दलची बांधिलकी, सामाजिक बांधिलकी, तुमच्या विचारातील ठामपणा, संघभावना, हजरजबाबीपण, समकालीन प्रश्न सोडविण्याची कुवत, दुरदृष्टीपण. चौफेर व्यक्तिमत्व, Sympathy and Empathy या बाबी तपसल्या जातात .

# एखाद्या विषयाबद्दल तुम्हाला मत प्रकट करायला सांगीतले परंतु तुम्ही त्या विषयाच्या बाबतीत अनभिज्ञ असेल तर उत्तर देण्याचा प्रयत्न करू नका, त्या विषयाबाबत माहिती नाही असे स्पष्ट सांगु शकता .
उदा. मला मुलखतीमध्ये BAMS डॉक्टरांना practice करण्यासंदर्भात नुकताच आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबतच तुमचे मत काय? असा प्रश्न विचारला होता. पंरुत मला महिती नाही मी sorry म्हणून दिलगिरी पण व्यक्त केली होती.

# मुलाखत ही तुमच्या व्यक्तीमत्वाची कसोटी आहे कोणत्याही परिस्थीतीत खोटे बोलू नका ‘ Honesty Is best Policy’ मुलाखत घेणारे खुप अनभुवी तज्ञ असतात. खोटे पकडले जाऊ शकते त्याची खात्री ते वेगळ्या प्रश्नाव्दारे करतात.
उदा. मी म्हटले होते की, UPSC ची मुलाखत दिली आहे. त्यासंदर्भात मला मुलाखतीचा दिनांक, पॅनेलची रचना असे प्रश्न विचारले होते.

# तुमच्या Bidata वर अधापित प्रश्नांची उत्तरे चुकायला नकोत. त्याबद्दल सर्व माहिती काढा. त्याबाबतीत तुम्हाला अद्यावत माहिती माहित असायला हवी.

# माझे मुख्य परीक्षेला ऐवढी मार्क आहेत. मला खुप मोठी मार्काची आघाडी आहे. माझी Post Fix आहे या अविरभावात राहुन मुलाखतीकडे दुर्लक्ष करू नका. मुलाखतीची तयारी पण sincerely करा. त्याचप्रमाणे मला मुलखतीला किमान एवढे मार्कस मिळायला पाहिजेत तरच मला अमुकअमुक post मिळेल असे ठोकताळे पण मांडू नका. त्यामुळे उगीच दबाव येतो त्यामुळे मुलाखतीसाठी नैसर्गिक खेळी करता येत नाही .

# मुलाखतीपर्यत तुम्ही तुमच्यातील काही कमतरता दुर करु शकता जशा की,

१]हात वरे जास्त होत असतील
२]बोलताना अडखळत असाल
३]चेहऱ्यावर हास्य येत नसेल (हास्य यायलाच हवे असे नाही परंतु nervous नसावे.)
४]मुलाखतीच्या दरम्यान होणारी तुमची अतिरीक्त हालचाल.

# मुलाखतीला मला हेच पॅनेल यायला हवे , तरच मला चांगली मुलाखत देता येईल असा विचार करू नका त्यामुळे उगीच वेगळी भिती निर्माण होते. लक्षात असू द्या की तुमच्या व्यक्तीमत्वाची परीक्षा आहे panel member च्या व्यक्तीमत्वाची परीक्षा नव्हे.

# कोणत्याही प्रश्नाचे उत्तर थोडक्यात देण्याचा प्रयत्न करा आणि जो प्रश्न विचारला आहे त्याला अनुसरूनच उत्तर द्या. प्रश्न काय विचारला आहे ? काळजीपूर्वक ऐका. तुम्ही प्रश्न किती एकाग्रपणे ऐकता हे पण बघितले जाते. काही वेळेस खुप मोठा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे एकाग्र राहण्याची सवय लावा. सद्या तुमच्याशी कोण बोलत असेल तर काळजीपूर्वक दुसर्याचे मनने ऐकून घ्या . उत्तर देताना घाई करू नका .

# मुलाखतीपर्यत दररोज Jogging आणि Meditation करा. त्यामुळे मन स्थिर राहयाला मदत होते. मुलाखत ही जवळजवळ काही वेळेस 30-40 मिनिटे चालते. त्यामुळे मन स्थिर राहणे आवश्यक असते.

# सर्वच प्रश्नांची उत्तरे यायलाच हवेत असे काही बंधन नसते त्यामुळे त्याचे tension घेऊ नका मुलाखतीला विचारलेल्या पहिल्याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत नसेल तर ते द्यायलाच हवे असा नियम नाही. सॉरी सर मला माहित नाही असे आत्मविश्वासपुर्वक सांगु शकता.

# भारतीय राज्यघटनेतील तत्वाशी तुमची किती बांधिलकी आहे हे पण मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांच्या अधारे विचारले जाते. त्यामध्ये जात, धर्म, लिंग, प्रदेश, आरक्षण,मुलभूत अधिकार,मुलभूत कर्तव्ये इत्यादी याबाबत प्रश्न विचारले जातात.

# अधिकारी हा राजकीय दृष्ट्या तटस्थ असला पाहिजे या अनुषंगाने राजकीय पक्ष, राजकीय नेते याबाबतीत प्रश्न विचारून याबाबतची चाचपणी केली जाते.

# मुलाखतीची पुर्व तयारी म्हणून mock interview जरूर द्या. त्यामुळे तुम्हाला तुमच्या चुका कुठे होतात ते लक्षात येते. त्या चुका पुढील mock मध्ये कमी करता येतात परंतु mock पण देऊ नका. Mock interview चांगल्या, अनुभवी तंज्ञाकडेच द्या.

# मुलाखतीसाठी एक छोटासा ग्रुप करा आणि त्यामध्ये विचारांची देवाणघेवाण करा. एकमेकांना प्रश्न विचारून तयारी करून शकता. परंतु कोणाचा तरी आत्मविश्वास कमी करण्यासाठी प्रश्न विचारु नका. दुसऱ्याबद्दल सकारात्मक विचार करणे हा एक मुलाखतीचाच एक भाग आहे हा तुमचा चांगला गुण दर्शवितो.

#WhatsApp वर पण तुम्ही ग्रुप तयार करा. आणि झालेल्या Interview ची देवाणघेवणा करा. विचारले गेलेल्या प्रश्नांची उत्तरांची चर्चा करू शकता. स्वतःलाच प्रश्न विचारून त्याचे उत्तर देऊ शकता. मलापण त्या WhatsApp group मध्ये add करा. (9423035088)

[icon type=”vector” icon=”momizat-icon-quotes-left” size=”32″ hover_animation=”border_increase” ]शेवटपर्यत उत्साही, आत्मविश्वासू, सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बोलण्यात स्पष्टपणा, भारदारपण ठेवण्याचा प्रयत्न करा. मुलाखतीमध्ये वशिला चालतो अशा फालतू विचारापासून दूर राहा,स्वत:वर विश्वास ठेवा. सर्वांना मुलाखतीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा. All the Best…!

(सदर लेख डॉ. अजित प्रकाश थोरबोले यांच्या ‘MPSC Simplified‘ या ब्लॉगवरून साभार घेण्यात आला आहे.)

Share This Article