⁠  ⁠

लून प्रोजेक्ट

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 2 Min Read
2 Min Read

रोटी, कपडा और मकान या तिन मुलभुत गरजांव्यतिरिक्त मानवाची इंटरनेट ही देखील मुलभुत गरज निर्माण झाली आहे. स्मार्टफोनच्या क्रांतीनंतर इंटरनेटचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला असून खर्‍या अर्थाने डिजीटल युगाची सुरुवात झाली आहे. इंटरनेटवर टु जी, थ्री जी व आता फोर जी ची धुम सुरु आहे. मात्र ग्रामीण व दुर्गम भागात इंटरनेटची रेंज नसल्याने एक मोठा भाग यापासून अजूनही दूर आहे. ही कमी दुर करण्यासाठी गुगल या कंपनीने लून प्रोजेक्ट सुरु केला आहे. २००८ साली गुगलने दक्षिण अमेरिकेतील तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी बलूनच्या सहाय्याने हवेत बेस स्टेशन सोडणार्‍या स्पेस डाटा कॉर्पोरेशन शी करार करायचे ठरवले होते; परंतु करार करण्यात आला नाही. २०११ साली गुगल द या कंपनी बरोबर गुगलने प्रोजेक्ट लूनवर काम करायला सुरुवात केली. दुर्गम व ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी दि. १८ फेब्रुवारी २०१६ रोजी श्रीलंकेतील पुरेसा परिसरात हेलियम भरलेले फुगे हवेत सोडून लून प्रोजेक्टचा शुभारंभ करण्यात आला.

१६ जून २०१३ ला गुगलने न्यूझीलंडमध्ये ३० बलून सोडून या प्रकल्पासाठी प्रयोग केला आणि त्यात यश आले. नंतर गुगलने जगभरात असे ३०० बलून सोडण्याचे ठरवले. मे – जून २०१४ मध्ये असाच बलूनचा प्रयोग ब्राझील येथे झाला. २८ जुलै २०१५ ला गुगलने श्रीलंकेच्या सरकारबरोबर करार केला. १८ फेब्रुवारी २०१६ रोजी श्रीलंकेत हेलियम भरलेले फुगे हवेत सोडून प्रोजेक्ट लूनची सुरुवात केली गेली.

प्रोजेक्ट लून मध्ये गुगल कंपनी १८ ते २५ किलोमीटर उंचीवर जाऊ शकतील असे हेलियम भरलेले फुगे आसमंतात सोडते. या फुग्यांमार्फत वायरलेस सिग्नल सोडले जातात. प्रत्येक फुगा त्याच्या परिघाच्या ४० किमी क्षेत्रात वायरलेस ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. ही सुविधा डोंगराळ, वाळवंटी वा इतर दुर्गम भागातील जनतेसाठी उपयुक्त ठरणारी आहे. भारतामध्ये प्रोजेक्ट लूनची सुविधा देण्याची परवानगी मिळावी म्हणून गुगल’ प्रयत्न करत आहे.

TAGGED:
Share This Article