डोंगराळ रांगेच्या कुशीत राहणाऱ्या अमृताने गाठले PSI पद !

PSI Success Story आयुष्यातील जडणघडणीत शिक्षण आणि एकूणच शालेय काळ महत्त्वाचा असतो. त्यासाठी ध्यास आणि निर्णयावर ठाम राहणे आवश्यक असते. कोणत्याही सुखसुविधा नसताना अमृता देखील महाराष्ट्रातील किल्ले पुरंदरच्या उपर डोंगर रांगेतील कुंभोशी या भागात राहणारी आहे‌. आसपास डोंगररांगा, घरची परिस्थिती गरिबीची असे असली तरी अमृताने धाडसाने PSI पद मिळवले.

भरत बाठे आणि संगीता बाठे या दाम्पत्याची लेक अमृता. अमृताचे आई – वडील दोघेही डोंगराळ भागात शेती असतात. ती शेती सांभाळून घराचा उदरनिर्वाह चालवला जातो. याच गावातील जिल्हा परिषद सरकारी शाळेत अमृताचे प्राथमिक शिक्षण झाले. तर अमृताने पुढील शिक्षणाचा मार्ग पुण्यातील महर्षी धोंडो केशव कर्वे येथील महिला वसतिगृहात प्रवेश निवडला व या पुढील शिक्षण तिने महर्षी कर्वे या शाळेतून पूर्ण केले.

शाळेत असतानाच तिने पोलीस होण्याची इच्छा जोपासली व आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येथूनच तिचा प्रवास सुरू झाला.पुण्यातला खर्च भागत नसल्याने काही खासगी क्लासमध्ये शिकवण्या द्यायला सुरुवात केली. हे काम करत नसताना तिने बी.ए परीक्षा देखील उत्तीर्ण केली….सोबतीला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा होताच.

एकीकडे शिक्षण, शिकवणी तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास….ही तारेवरची कसरत पार करत तिने पहिल्यांदा २०१९ मध्ये एमपीएससीची परीक्षा दिली पण केवळ दोन गुणांनी तिला अपयश आले. इथे हार न मानता २०२० च्या परीक्षेच्या दृष्टीने तयारी करायला सुरुवात केली. तेव्हा नेमका कोराना लागल्याने लॉकडाऊनमुळे ही परीक्षा चार वेळा ही परीक्षा पुढे ढकलली गेली.

१९ महिन्यांनी अमृताला ही परीक्षा देण्याची संधी मिळाली. अखेर परीक्षेचा निकाल लागला आणि तिच्या कष्टांचे चीज होत तिची यावेळी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली.

मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी संयम हा महत्त्वाचा असतो.