⁠
Jobs

दोन-तीन वेळेस अपयश, खचून न जात पुन्हा परीक्षा दिली, अन् झाली PSI

कोणतेही यश मिळविणे सोपे नाही. त्यासाठी कठोर मेहनत परिश्रम घ्यावं लागते. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर एका शेतकऱ्याच्या मुलीने MPSC सारख्या परीक्षेत यश मिळविलं आहे. छत्रपती संभाजीनगरजिल्ह्यातील सुलीभंजन या गावातील कोमल जाधव हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मोठं यश संपादित केलं असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन हे कोमल जाधव हिचे मूळ गाव असून तिची आई अंगणवाडी सेविका आहे तर वडील घरी शेती कमी असल्यामुळे मोलमजुरी करतात. कोमल गावात शिक्षणाची सुविधा नसल्यामुळे संभाजीनगर शहरामध्ये शिवाजीनगर येथील तिच्या मामा आजी आजोबा यांच्याकडे शिक्षणासाठी आली. तिने पहिले ते दहावी शिक्षण ज्ञानांकुर शाळेमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर तिने तिचे महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये पूर्ण केलं.

कोमल ही लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होती. तिला अभ्यासाबरोबरच खेळाची सुद्धा आवड आहे. ती नॅशनल लेवलची तलवार बाजी खेळाडू आहे. कोमलने नॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेले आहे. तेव्हा शाळामध्ये सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रमासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप भाजीभाकरे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांचं भाषण झाल्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा कोमलनं ठरवलं आपण सुद्धा असेच अधिकारी व्हायचं आणि एक दिवस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं.

त्यानंतर कोमलनं स्पर्धा परीक्षांची तयारी करायला सुरुवात केली. अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या. तिला दोन-तीन वेळेस पोलीस परीक्षेत अपयश आले. तरीसुद्धा तिने न थांबता न खचून जाता परत परीक्षा दिली आणि तिला यामध्ये यश मिळाले आहे.

मला लहानपणापासूनच शासकीय सेवेत अधिकारी होण्याची आवड होती. मी जेव्हा नॅशनलमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. तेव्हा पोलीस आयुक्त संदीप भाजीभाकरे यांच्याकडून माझा सत्कार करण्यात आला होता. त्यांना बघून मला खूप प्रेरणा मिळाली आणि मी पण ठरवलं की आपण सुद्धा असेच काहीतरी बनायचं. तेव्हापासून मी स्पर्धा परीक्षेला तयारी केली. मला दोन-तीन वेळा पोलीस भरतीमध्ये अपयश आलं. तरी पण मी खचून न जाता परत 2020 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाचा फॉर्म भरला आणि त्यामध्ये मला यश मिळालं याचा मला खूप आनंद आहे, असं कोमल जाधव सांगते.

Related Articles

Back to top button