⁠  ⁠

सकाळी काम, रात्री अभ्यास ; किराणा दुकानचालकाचा मुलगा झाला PSI

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

PSI Success Story झहीर शेख याच्या वडिलांच्या आणि आईच्या खानदानात पदवीधर होणारा झहीर हा पहिला तरुण. त्यांचे आई – वडील दोघेही मोलमजूरी करून काम करतात. तर सोबतीला सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात छोटेखानी किराणा दुकान चालवतात.

आपल्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावे आणि कामधंदा बघावा हेच त्याला देखील आई – वडिलांकडून सांगणे होणे. आपली परिस्थिती बदलायची असेल तर उच्च शिक्षणासोबतच सरकारी अधिकारी नक्कीच होऊ, हा ध्यास त्यांनी त्याचक्षणी घेतला. वेळप्रसंगी शिक्षणासाठी मिळेल ते काम केले.

पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोहोळ या ठिकाणी झाले. ११वी, १२वी विज्ञान विषयातून पास झाल्यानंतर बीएससी करण्यासाठी पदवी महाविद्यालय गावात नव्हते. त्यामुळे बी.कॉम विषयातून पदवी घेतली.तब्बल सात वर्षे मोहोळचा झहीर शेख कोल्हापुरात राहून एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. तो सकाळी काम करायचा संध्याकाळी घरी आल्यावर रात्रभर स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा.

हे अभ्यासातील सातत्य हाच त्याचा यशाचा मंत्र आहे. त्यामुळेच तो त्याच्या खानदानातील पहिला पदवीधर ठरला आणि तो स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणाराही पहिलाच आहे

Share This Article