⁠  ⁠

खुशखबर! रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक (TTE) पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

Chetan Patil
By Chetan Patil Add a Comment 2 Min Read
2 Min Read

Railway TTE Bharti 2024 रेल्वेत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय रेल्वेच्या रेल्वे भर्ती बोर्ड कडून लवकरच प्रवासी तिकीट परीक्षक (TTE) पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. तब्बल 8000 हजाराहून अधिक जागांसाठी ही भरती होणार आहे. Railway Bharti 2024

इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in ला भेट देऊन माहिती घेऊ शकतात. अर्जाची प्रक्रिया मे 2024 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा असून ती जून 2024 मध्ये संपणार आहे. लक्ष्यात असू द्या या भरतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत सूचना जारी करण्यात आलेली नाही. Railway Recruitment 2024

रिक्त जागा : 8,000+
पदाचे नाव : प्रवासी तिकीट परीक्षक
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी :
सामान्य आणि ओबीसी श्रेणींसाठी: रु. 500
अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी: रु. 300
पगार : रु. 27,400 ते रु. 45,600 असा अपेक्षित आहे.
कशी असेल निवड प्रक्रिया?
लेखी परीक्षा
शारीरिक चाचणी
वैद्यकीय चाचणी

अर्ज कसा करावा
पहिल्यांदा indianrailways.gov.in या वेबसाईटला भेट द्या
त्यानंतर latest ऑप्शनवर गेल्यानंतर Railway TTE recruitment 2024 सर्च करा
Railway TTE recruitment Section मध्ये Apply Online link क्लिक करा
येथे सर्व माहिती भरावी लागेल आणि पुढील बटणावर (Next Button) क्लिक करा
आकारानुसार तुमचा फोटो आणि अंगठ्याचे ठसे अपलोड करा
पुढील पेजवर, तुम्ही फी जमा करा आणि तुमची तारीख सेव्ह करा आणि तुमचा फॉर्म सबमिट करा

TAGGED:
Share This Article
Leave a comment