कोरोनामुळे मागील वर्षी राज्यसेवा परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते.त्यातून मार्ग काढत १४ मार्च २०२१ रोजी परीक्षा होणार होती.पण आयोगाने जाहीर केलेल्या पत्रकांनुसार १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणारी परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.
आयोगाचे याविषयी म्हणणे-
१)राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बध लावेलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
२) शासनाकडून घेण्यात आलेल्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही पुढे ढकलण्यात येत आहे.
३)परीक्षेची सुधारित दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल.