SAIL Recruitment 2025 : स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAIL) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. विषेश विनापरीक्षेत थेट भरती होणार आहे. या नोकरीसाठी भरती वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख २३ जुलै २०२५ आहे. सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत रिपोर्ट करणे आवश्यक आहे.
एकूण रिक्त जागा : १६
पदाचे नाव : स्पेशलिस्ट (Specialists) आणि जीडीएमओ (GDMO)
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस किंवा पीजी डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवारांकडे इतर विहित पात्रता देखील असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे कमाल वय ३० जून २०२५ रोजी ६९ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
वेतन श्रेणी :
स्पेशलिस्ट पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा १,६०,००० ते १,८०,००० रुपये वेतन दिले जाईल. याशिवाय, जीडीएमओ पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना ९०,००० ते १,००,००० रुपये वेतन दिले जाईल.
ही कागदपत्रे आवश्यक असतील
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती १ वर्षासाठी होणार आहे. यानंतर हा कालावधी वाढवला जाऊ शकतात. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे देखील बंधनकारक आहे. मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांना पासपोर्ट साइज फोटो, जन्म प्रमाणपत्र, इंटर्नशिप प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, वोटर आयडी, आधार कार्ड हे कागदपत्र घेऊन जायचे आहे.
अधिकृत संकेतस्थळ : https://sailcareers.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा







