भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाचा प्रचार-प्रसार केल्याने त्याची दखल जगभरातील देश घेत आहेत. इस्लामिक देश असलेल्या सौदी अरबने तर योगाला खेळाचा अधिकृत दर्जा दिला आहे. सौदी अरबच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने खेळाचा एक भाग म्हणून योग शिकण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे सौदी अरबमध्ये आता परवाना घेऊन योग शिकविला जाणार आहे. विशेष म्हणजे नोफ मारवाई नावाच्या महिलेला पहिली योग प्रशिक्षिकेचा दर्जाही देण्यात आला आहे. योगाला खेळाचा दर्जा मिळावा म्हणून नोफ मारवाई यांनी विशेष प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी मोठं अभियान चालवलं होतं. त्यांनी ‘अरब योग फाऊंडेशन’चीही स्थापना केली होती. ‘योग आणि धर्म यात कोणतीही अडचण नाही. कोणताही वाद नाही,’ असं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, भारताच्या प्रयत्नामुळे २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने योगाला वैश्विक स्तरावर मान्यता दिली आहे. त्यामुळे दरवर्षी जगभरात २१ जून हा दिवस ‘योग दिन’ म्हणून साजरा केला जातो.
LATEST Post
केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत विविध पदांसाठी मोठी भरती; 10वी ते पदवीधरांना संधी
Published On: सप्टेंबर 21, 2026
भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 590 जागांसाठी भरती ; 12वी ते पदवीधरांना मोठी संधी
Published On: सप्टेंबर 18, 2026
खादी व ग्रामोद्योग महामंडळात विविध पदांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 18, 2026
SSC मार्फत विविध पदांच्या 1871 जागांसाठी नवीन भरती ; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना संधी
Published On: सप्टेंबर 11, 2026
दिल्ली उच्च न्यायालयात पदवीधरांना नोकरीची संधी; 150 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 11, 2026
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत पदवीधरांना नोकरीची संधी; 225 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 9, 2026
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या 2536 जागांसाठी भरती ; 12वी उत्तीर्णांना संधी
Published On: सप्टेंबर 9, 2026
RCFL मार्फत 326 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 5, 2026















