आईने -वडिलांनी काबाडकष्ट करत घडवले अन् लेक झाली पोलिस !

Published On: जुलै 13, 2024
Follow Us

प्रणवी झाडगे या कृषीकन्येची घरची परिस्थिती जेमतेम बेताचीच होती…आई आणि वडील गावातील शेतकऱ्यांच्या शेतात मोलमजुरीचे काम करतात. अशा परिस्थितीत तिने पोलिस होण्यासाठी धडपड केली आणि ती यशस्वी झाली. हल्ली‌ गावातील अनेक मुले व मुली पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत. तसेच ह्याच परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र मुंबई पोलीस पदाला प्रणवीने गवसणी घातली आहे.

तिचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नाथाचीवाडी येथे पूर्ण झाले. माध्यमिक शिक्षण माटोबा विद्यालय नाथाचीवाडी येथे आणि त्यानंतर विद्यालयीन शिक्षण भैरवनाथ विद्यालय खुटबाव येथे पूर्ण केले. तिला लहानपणापासूनच वर्दीचे आकर्षण होते. त्यासाठी तिची मेहनत पण बरीच होती. म्हणूनच तिने एका अकादमीला पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेतले.

आईने -वडिलांनी काबाडकष्ट करत मुलांना घडविले. त्या कष्टाची जाण प्रणवीने सतत ठेवली. आई आणि वडिलांनी मुलगी पोलीस बनली पाहिजे याच्यासाठी तिला कशाची कमी पडू नाही दिली. तिने देखील तेवढेच कष्ट घेतले. नाथाचीवाडी या छोट्याशा गावातील प्रणवी संजय झाडगे ह्या गरीब शेतकरी मजूर कुटुंबातील या मुलीने मुंबई पोलीस भरतीमध्ये बाजी मारत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025