• Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us
Thursday, June 30, 2022
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational
No Result
View All Result
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result

अर्थव्यवस्थांचे प्रकार

Tushar Bhambare by Tushar Bhambare
May 14, 2022
in Economics
0
types-of-economy-chart

अर्थव्यवस्थांचे प्रकार

WhatsappFacebookTelegram

अर्थव्यवस्था (Economics) हे एक प्रकारचे सामाजिकशास्त्र (Social Science) आहे. अर्थशास्त्र वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादन, वितरण आणि वापराचे विश्लेषण करते.

अॅडम स्मिथ यांच्या मते – ‘अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या संपतीच्या स्वभाववैशिष्ट्यांची आणि कारणांची चिकित्सा होय.’

१) मुक्त अर्थव्यवस्था (Market Economy) : या अर्थव्यवस्थेला Laissez Faire किंवा Self-managed economy असेही म्हणतात. शासन देशातील उत्पादन, किंमत निर्धारण, गुंतवणुकीचे निर्णयांवर कुठलाही ताबा ठेवत नाही. उद्योग मुक्तपणे बाजारात ज्या वस्तुंची मागणी असेल किंवा ज्या वस्तुंपासून जास्त नफा मिळेल अशा वस्तू तयार करतात. भांडवलशाही देशांमध्ये अशा प्रकारची मुक्त अर्थव्यवस्था राबविली जाते. उत्पादनाबाबत कुठलेही नियोजन नसल्यामुळे अशा अर्थव्यवस्थेला अनियोजित (Unplanned economy) असेही म्हणतात.

२) नियोजित अर्थव्यवस्था (Planned Economy) : हि अर्थव्यवस्था असणाऱ्या  देशात एखादी मजबूत केंंद्रीय संस्था असते. उदा.नियोजन आयोग. ही संस्था त्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या व गुंतवणुकीच्या संबंधित एखादी योजना तयार करते. या योजनेला अनुसरून सर्व निर्णय घेतले जातात. समाजवादी अर्थव्यवस्थेत नियोजित अर्थव्यवस्थेचे सूत्र वापरले जाते. वस्तूंची मागणी किंवा नफा लक्षात न घेता जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनावर लक्ष दिले जाते. नियोजित अर्थव्यवस्थेचे दोन प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे –

i) आदेशात्मक नियोजित अर्थव्यवस्था (Command economy) : नियोजित अर्थव्यवस्थेचे कडक-अतिकेंद्रीत स्वरूप म्हणजे आदेशात्मक अर्थव्यवस्था. अशा अर्थव्यवस्थेत केंद्रसंस्था किंवा शासनाच्या हातात सर्व आर्थिक अधिकार दिले जातात.

ii) सूचनात्मक नियोजित अर्थव्यवस्था (Indicative economy) : हे नियोजित अर्थव्यवस्थेचे थोडे ढिले स्वरूप असते. म्हणजे एखाद्या विशिष्ठ क्षेत्रातील गुंतवणूक किंवा उत्पादन वाढविण्यासाठी आदेश न देता सूचना दिली जाते. अनुदाने, सबसिडी, करमुक्तता अशी आमिषे दाखविली जातात. याला Planned Market economy असे म्हणतात.

३) मिश्र अर्थव्यवस्था (Mixed economy) : नियोजित अर्थव्यवस्था समाजवादाचे लक्षण असून मुक्त अर्थव्यवस्था भांडवलवादाचे लक्षण आहे. मिश्र अर्थव्यवस्थेत दोन्ही नियोजित तसेच मुक्त अर्थव्यवस्थांचे सहअस्तित्व असते.

संदर्भ-
पुस्तक : स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र – १
लेखक : डॉ. किरण जी. देसले
प्रकाशक : दीपस्तंभ प्रकाशन, जळगाव

Tags: Deepastambh PublicationDeepastambha FoundationEconomicsKiran Desaletypes of economy
SendShare271Share
Tushar Bhambare

Tushar Bhambare

Related Posts

Rajyaseva 2021 Economics
Economics

मिशन राज्यसेवा २०२१ : अर्थशास्त्र

October 27, 2021
maharashtra-economic-survey-2017-18
Economics

[PDF] महाराष्ट्राची आर्थिक पाहणी – 2017-18

March 10, 2018
indian-economy-study-for-mpsc
Economics

स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र

March 1, 2018

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NABCONS

NABCONS : नाबार्ड कंसल्टेंसी सर्विसेज महाराष्ट्रमध्ये भरती

June 29, 2022
sbi bharti 2022

SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 211 जागा

June 29, 2022
MPSC State Service Prelims Admit Card 2021

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1695 पदे रिक्त

June 29, 2022
Police Bharti 2022

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 । Police Bharti 2022 Maharashtra

June 29, 2022
Current Affairs 29 june 2022

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 29 जून 2022

June 29, 2022
police bharti

Police Bharti : राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया ; गृहविभागाची अधिसूचना जारी

June 28, 2022
  • Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group