⁠  ⁠

नोकरी सांभाळून अभ्यास केला अन् गडचिरोलीचे गटविकास अधिकारी झाले UPSC परीक्षा उत्तीर्ण !

Chetan Patil
By Chetan Patil Add a Comment 2 Min Read
2 Min Read

UPSC Success Storry : आपण समाजाचे देणे लागतो. त्यामुळे दुर्गम भागात राहून काम करण्याच्या उद्देशाने अभिजित पाखरे यांनी एक पत्र लिहिले होते. मध्यंतरी हे एका अधिकाऱ्याने लिहिलेले पत्र व्हायरल झाले होते.यात अतिदुर्गम भागातून प्रशासकीय सेवेची सुरवात करण्याच्या हेतूने त्यांनी प्रधान सचिवांना पत्र लिहून गडचिरोली जिल्ह्यातच पोस्टिंग देण्याची विनंती केली होती.‌त्या विनंतीनुसार गडचिरोलीच्या अहेरी या ठिकाणी गटविकास अधिकारी म्हणून नेमण्यात आले.

महाराष्ट्र लोकसेवआयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून स्वतःहून गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात सेवेची संधी मागितल्याने गटविकास अधिकारी अभिजित पाखरे सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय झाले होते.त्या अधिकाऱ्यांचे नाव आहे अभिजित पाखरे. अभिजित गहिनीनाथ पाखरे हे मूळचे बिड जिल्ह्यातील पाडळी तालुक्यातील शिरूर कासार गावाचे रहिवासी आहेत.नुसत्याच लागलेल्या युपीएससी परीक्षेत त्यांनी‌ बाजी मारली आहे.

खासगी शाळेत शिक्षक असलेले वडील ग्रामपंचायतीचे सरपंचही आहेत. २०१९ मध्ये त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली व पहिल्याच प्रयत्नात उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी या पदासाठी त्यांची निवड झाली. पण त्यांनी नोकरी सांभाळून अभ्यास चालूच ठेवला. पुढचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण बीडच्या चंपावती विद्यालयात घेतले.

त्यानंतर त्यांनी पदवी संपादन केल्यावर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली.आधी एमपीएससी व नंतर यूपीएससीत बाजी मारत त्यांनी यशाला गवसणी घातली आहे.१३ मार्च २०२४ पासून ते अहेरीत कर्तव्य बजावत होते. दरम्यान, त्यांनी २०२३ मध्ये यूपीएससी २०२३ ची नागरी सेवा परीक्षाही दिली होती. यात ७२० व्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले.

Share This Article
Leave a comment