⁠  ⁠

सहावीत नापास झाली पण पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत गाठले यश !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC Success Story : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्षे तयारी करतात. अनेक इच्छुक परीक्षांच्या तयारीसाठी कोचिंग घेतात, तर काही स्वयं-अभ्यासावर अवलंबून असतात. आज आपण पंजाबमधील गुरुदासपूर येथील रहिवासी असलेल्या रुक्मणी रियारने कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षेची तयारी कशी केली? पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न कसे पूर्ण केले? याबद्दल बोलणार आहोत.

रुक्मणी रियार यांचे सुरुवातीचे शिक्षण गुरुदासपूर येथे झाले. यानंतर ती चौथीत असताना डलहौसी येथील सेक्रेड हार्ट शाळेमध्ये गेली. बारावीनंतर रुक्मणीने अमृतसरमधील गुरु नानक देव विद्यापीठातून सामाजिक शास्त्रात पदवी घेतली. यानंतर तिने मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूटमधून सामाजिक शास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आणि सुवर्णपदक विजेती ठरली.

पदव्युत्तर शिक्षणानंतर रुक्मणी रियार यांनी नियोजन आयोगाव्यतिरिक्त म्हैसूरमधील अशोकया आणि मुंबईतील अन्नपूर्णा महिला मंडळासारख्या स्वयंसेवी संस्थांमध्ये इंटर्नशिप केली. याच काळात रुक्मणी नागरी सेवेकडे आकर्षित झाली आणि तिला यूपीएससीची परीक्षा द्यायची होती. युपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी रुक्मणी रियारने सहावी ते बारावी पर्यंतच्या एनसीईआरटीच्या पुस्तकांची तयारी केली. मुलाखतीची तयारी करण्यासाठी ती दररोज वर्तमानपत्रे आणि मासिके वाचत असे. परीक्षेदरम्यान झालेल्या चूका कमी करण्यासाठी रुक्मिणीने अनेक मॉक टेस्टमध्ये भाग घेतला. रुक्मणी यांनी गेल्या अनेक वर्षांच्या प्रश्नपत्रिकाही सोडवल्या. याच सातत्याने केलेल्या मेहनतीमुळे ती पहिल्या प्रयत्नात आयएएस अधिकारी झाली.

Share This Article