⁠  ⁠

विराट कोहलीचे कसोटी कारकीर्दीतील पाचवे द्विशतक

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 1 Min Read
1 Min Read

भारताचा कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आपल्या कसोटी कारकीर्दीतील पाचवे द्विशतक झळकाविले. विराटचे हे पाचवे कसोटी द्विशतक आहे. राहुल द्रविडशी त्याने आता बरोबरी केली असून सचिन तेंडुलकर आणि वीरेंदर सेहवाग हे त्याच्यापेक्षा एका शतकाने पुढे आहेत.विराटने वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश व श्रीलंकेविरुद्ध त्याने ही द्विशतके केली. विराटने या वर्षात १० शतके झळकाविली आहेत. एकाच वर्षात एवढी शतके करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. त्यात वनडेत ६ शतके असून कसोटीत त्याच्या नावे ४ शतके आहेत. रिकी पॉन्टिंगने २००५ व २००६मध्ये दोन्ही क्रिकेट प्रकारात ९ शतके ठोकली होती. तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या खात्यावरही अशीच ९ शतके जमा आहेत. त्यांना विराटने मागे टाकले आहे. भारतीय कर्णधार म्हणून विराट हा सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू ठरला आहे. याआधी, माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या नावावर ११ शतके होती. विराटने १२ शतके केली आहेत. आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून किमान दहा शतकांची तुलना केली तर विराटचा शतके पूर्ण करण्याचा वेग हा सर डॉन ब्रॅडमन आणि मायकेल क्लार्क यांच्यापेक्षाही सरस आहे. ३१ कसोटीत कोहलीने कर्णधारपद भूषवताना १६वेळा ५० धावा केल्या आणि त्यात १२वेळा त्याने शतके पूर्ण केली. हा वेग ७५ टक्के आहे. ब्रॅडमन आणि क्लार्कहा हा वेग ६६.६६ टक्के आहे.

Share This Article