वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत साईखोम मीराबाई चानूने 194 किलो वजन उचलून नवीन विश्वविक्रम रचला आहे. या कामगिरीसह चानूने सुवर्णपदकाला गवसणी घातली. अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर आहे. 22 वर्षांपूर्वी कर्णम मल्लेश्वरीने भारताकडून पहिली वर्ल्ड चॅम्पियन बनली होती. अमेरिकेतील अनहिम येथे आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत चानूने 48 किलो वजनी गटात पहिल्यांदा 85 किलो आणि दुस-यांना 109 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले. चानूच्या आधी कर्णम मल्लेश्वरीने 1994 आणि 1995 साली गोल्ड मेडल मिळवले होते. मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदकही मिळवले होते. थायलंडच्या सुकचारोन तुनियाने रौप्य आणि सेगुराने इरिसने कांस्यपदक पटकावले. डोपिंगच्या प्रकरणामुळे रशिया, चीन, कझाकस्ता, युक्रेन आणि अझरबैजान या देशाचे वेटलिफ्टर्स स्पर्धेत सहभागी झाले नव्हते.
LATEST Post
बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदाच्या 837 जागांसाठी भरती
Published On: नोव्हेंबर 5, 2026
मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 2861 जागांवर मेगाभरती जाहीर
Published On: नोव्हेंबर 5, 2026
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 3047 जागांसाठी भरती ; 10वी/ITI उमेदवारांना संधी
Published On: नोव्हेंबर 2, 2026
अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटीत विविध पदांच्या 254 जागांसाठी भरती
Published On: नोव्हेंबर 2, 2026
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक मार्फत भरती जाहीर
Published On: ऑक्टोबर 24, 2026
LIC-हाउसिंग फायनान्स लि. मध्ये 232 जागांसाठी भरती; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना संधी
Published On: ऑक्टोबर 23, 2026
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.मध्ये 660 जागांसाठी भरती ; 10वी उत्तीर्ण, ITI उमेदवारांना संधी
Published On: ऑक्टोबर 23, 2026
सतीश धवन स्पेस सेंटर मार्फत विविध पदांसाठी भरती; 10वी ते पदवीधरांना संधी
Published On: ऑक्टोबर 21, 2026















