⁠  ⁠

Current Affair 04 February 2019

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती न झाल्यास ‘पद्मभूषण’
परत करणार : अण्णा हजारे

  • लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त्यांबाबत दोन दिवसांत निर्णय न झाल्यास पद्मभूषण पुरस्कार राष्ट्रपतींना परत करणार, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला आहे.
  • राळेगणसिद्धी येथे अण्णा या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. काही वेळापूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांनी उपोषण स्थगित करावे यासाठी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्यांना यश आले नाही.
  • समाजाची जर दुरावस्था झाली असेल आणि सरकार त्याकडे कानाडोळा करीत असेल तर मला हा पुरस्कार नको. त्यामुळे ८ आणि ९ तारखेला सरकराचा निषेध करण्यासाठी पद्मभूषणही मी राष्ट्रपतींना परत करणार आहे.

नागरिकत्व विधेयकाविरोधात पद्मश्री परत

  • नागरिकत्व विधेयकाच्या निषेधार्थ प्रख्यात मणिपुरी चित्रपट निर्माते अरिबाम श्याम शर्मा यांनी ‘पद्मश्री’ सन्मान परत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
  • शर्मा हे मणिपूरमधील प्रसिद्ध निर्माते असून, चित्रपट क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना २००६ मध्ये ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले होते.
  • शर्मा यांनी मणिपुरी भाषेत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांना याआधीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शर्मा हे ८२ वर्षांचे आहेत.
  • आसाम आंदोलनात हुतात्मा झालेल्या ८५५ लोकांच्या १२५ कुटुंबीयांनी गेल्या महिन्यांत गुवाहाटी येथे नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात रॅली काढून त्यांचे पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती.

IND vs NZ: टीम इंडियाचा परदेशात पाचव्यांदा 4-1 ने मालिका विजय

  • रायुडूची दमदार खेळी, अचूक गोलंदाजी आणि महेंद्रसिंग धोनीचे चाणाक्ष यष्टीरक्षकाच्या जोरावर भारताने शेवट गोड केला.
  • पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 35 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिका 4-1 अशा फरकाने खिशात टाकली.
  •  रायुडूने दमदार 90 धावांची खेळी साकारल्यामुळे भारताना 252 धावा करता आल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्याचा रायुडू हाच सर्वोत्तम खेळाडू ठरला.

मिस्टर आशियाई स्पर्धेत भारताच्या विजय आणि मंगला यांची बाजी

  • आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मिस्टर आशियाई स्पर्धेत भारताच्या विजय भोयरने बाजी मारली. त्याचबरोबर मिस आशिया या स्पर्धेतही भारताच्या मंगला सेनने सुवर्णपदकाला गवसणी घातली.
  • नवी दिल्ली येथी तालकटोरा इंडोर स्टेडियममध्ये मिस्टर आशिया बॉडीबिल्डींग आणि फिटनेस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या भारतासह श्रीलंका, बांगलादेश, भुतान, नेपाळ या देशांचा समावेश होता. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकूण 94 शरीरसौष्ठवपटूंना प्रवेश देण्यात आला होता. भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे महासचिव सुरेश कदम यांनी विजेत्यांना पारितोषिक दिले.
Share This Article