• Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us
Tuesday, March 28, 2023
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational
No Result
View All Result
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result

Home / Current Affairs 03 May 2019

Current Affairs 03 May 2019

May 3, 2019
Chetan PatilbyChetan Patil
in Daily Current Affairs
chalu ghadamodi current affairs in marathi
SendShare132Share
Join WhatsApp Group

इंडोनेशिया राजधानी दुसरीकडे हलवणार

  • इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये प्रचंड लोकसंख्येचा दाब वाढू लागला आहे. त्यामुळे आता राजधानी दुसऱ्या शहरात हलवण्याबाबत इंडोनेशियाकडून विचार सुरू झाला आहे. मात्र प्रत्यक्ष राजधानी दुसरीकडे हलवण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. सध्या जकार्तामध्ये 3 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. त्यामुळे राजधानीचे हे शहर अत्यंत दाटीवाटीचे आणि प्रचंड वाहतुक कोंडीचे बनले आहे. याशिवाय जकर्तामध्ये वारंवार पूर येत असतात. भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा केल्यामुळे जकार्ता वेगाने बुडायला लागलेल्या शहरांमध्ये सर्वात आघाडीवर आहे. दाटीवाटीने झालेली लोकवस्ती आणि पूरांमुळे जकार्ताला दरवर्षी अब्जावधी डॉलरचे नुकसान सोसावे लागते.
    आता राजधानीचे शहर जकार्तापासून दूर जावा बेटावर हलवले जाईल.

ज्ञानेश्वर मुळे यांनी स्विकारली मानवाधिकार आयोगाच्या सदस्यपदाची सूत्रे

  • सुप्रसिध्द लेखक, विचारवंत तसेच माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्यपदाची सूत्रे नुकतीच राजधानीत स्वीकारली. आयोगाचे अध्यक्ष व माजी सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांनी मुळे यांना शपथ दिली. आयोगाचे सदस्य झाल्यामुळे ज्ञानेश्वर मुळेंना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा दर्जा प्राप्त झाला आहे.
  • मुळे यांनी यापूर्वी सुमारे ३५ वर्षे भारताच्या विदेश मंत्रालयात सेवा बजावली असून मालदीव, अमेरीका, रशिया, जपान आदी राष्ट्रात राजदूत व वाणिज्यदूत म्हणून काम पाहिलेले आहे.
  • मुळे हे मराठीचे एक यशस्वी व शक्तिशाली लेखक असून त्यांनी १५ हून अधिक पुस्तके लिहिली आहे. त्यांचा अनुवाद अरबी, उर्दू, कन्नड आणि हिंदी मध्ये केला गेला आहे. माती पंख आणि आकाश हे मराठी भाषेतील एक अतिशेय लोकप्रिय असलेलं पुस्तक आहे.

मेस्सीचा नवा विक्रम; गाठला ६०० गोलचा टप्पा

  • स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने Champions League फुटबॉल स्पर्धेत खेळताना एक नवा इतिहास रचला. बार्सिलोना या फुटबॉल क्लबकडून खेळताना त्याने या संघासाठी ६०० गोलचा टप्पा गाठला.
  • नौ कॅम्प येथे Champions League उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळताना मेस्सीने लिव्हरपूर विरोधात हा मैलाचा दगड पार केला. फ्री किक च्या माध्यमातून मेस्सीने हा गोल केला. त्याच्या कामगिरीच्या बळावर बार्सिलोनाने लिव्हरपूरला ३-० असे पराभूत केले.
  • मेस्सीने केलेल्या गोलपैकी ४९१ गोल हे डाव्या पायाने केलेले आहेत. तर ८५ गोल हे उजव्या पायाने केलेले आहेत. याशिवाय हेडर म्हणजेच डोक्याने केलेल्या गोलची संख्या २२ आहे. मेस्सीने ६०० गोल करण्यासाठी बार्सिलोनाकडून ६८३ सामने खेळले.
Join WhatsApp Group
SendShare132Share
Chetan Patil

Chetan Patil

Tags: chalu ghadamodiCurrent AffairsMPSC Current Affairs
Previous Post

Current Affairs 02 May 2019

Next Post

Current Affairs 04 May 2019

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In