Current Affairs : 04 December 2020
राेशनी नाडर देशातील सर्वात श्रीमंत महिला
एचसीएल टेक्नाेलाॅजीच्या राेशनी नाडर मल्हाेत्रा या काेटक हुरुन रिच लिस्ट अनुसार देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण मालमत्ता ३६,८०० कोटी रु. अाहे. बाॅयकाॅनच्या किरण मुजुमदार-शाॅ यांचाही यादीत समावेश आहे
७५० गोल करणारा रोनाल्डो इतिहासात तिसरा फुटबाॅलपटू
क्रिस्टियानो रोनाल्डोने युक्रेनचा क्लब डायनेमो कीव्हविरुद्ध गोल करत आणखी एक विक्रम रचला.
युवेंट्सच्या रोनाल्डोचे करिअरमध्ये ७५० गोल पूर्ण झाले. तो फुटबॉलच्या इतिहासात ७५० पेक्षा अधिक गोल करणारा तिसरा खेळाडू बनला.
जोसेफ बिकेनने ७५९ आणि पेलेने ७५७ गोल केले आहेत. यात क्लब व आंतरराष्ट्रीय दोन्ही गोलचा समावेश आहे.
चॅम्पियन लीगच्या साखळी फेरीत युवेंट्सने घरच्या मैदानावर डायनेमो कीवला ३-० ने हरवले.
फेडेरिको चीसाने २१ व्या, रोनाल्डोने ५७ व्या, अल्वारो मोराताने ६६ व्या मिनिटाला गोल केले.
गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केली देशातील टॉप-१० पोलिस ठाण्यांची यादी
केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील टॉप-१० पोलिस ठाण्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.
या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलीस ठाण्याचा समावेश झालेला नाही.
देशातील टॉप-१० पोलीस ठाण्यांच्या यादीमध्ये वेगवेगळ्या राज्यातील पोलीस ठाण्यांना स्थान मिळाले आहे.
यामध्ये मणिपूरमधील थौबल येथील नोंगपोक सेमकई पोलिस ठाण्याने अव्वल क्रमांक पटकावला.
तामिळनाडूमधील एडब्ल्यूपीएस सुरमंगलम पोलिस ठाणे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर अरुणाचल प्रदेशमधील खरसांग पोलिस ठाण्याला तिसरा क्रमांक मिळाला. मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलिस ठाण्याला स्थान देण्यात आलेले नाही.
देशातील दहा पोलिस ठाणी
नोंगपोक सेमकई (थौबल, मणिपूर)
एडब्ल्यूपीएस सुरमंगलम (सालेम, तामिळनाडू)
खरसांग (चांगलांग, अरुणाचल प्रदेश)
झिलमिल (सुरजापूर, छत्तीसगड)
संगुएम (दक्षिण गोवा, गोवा)
कालीघाट (उत्तर आणि मध्य अंदमान, अंदमान आणि निकोबार)
पॉकयाँग (पूर्व जिल्हा, सिक्किम)
कांठ (मुरादाबाद, उत्तर प्रदेश)
खानवेल (दादरा आणि नगर हवेली)
जम्मीकुंटा टाऊन (करीमनगर, तेलंगाणा)
महाराष्ट्राच्या गुरुजींना 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर प्राईज पुरस्कार
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ जाहीर झाला असून सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार जाहीर झाला.
लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.
जगभरातील १४० देशांतील १२ हजार हुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. क्यूआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.