⁠  ⁠

चालू घडामोडी : ०५ एप्रिल २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs 05 April 2020

बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्ज ०.७५ टक्क्यांनी स्वस्त

Bank of Maharashtra lowers lending rates by a nominal 5 bps - The ...

बँक ऑफ महाराष्ट्रने कर्जाचे व्याजदर ०.७५% घटवलेआहेत. रेपोलिंक्ड हे दर ७ एप्रिलपासून घटतील. हे गृह, शैक्षणिक, वाहन कर्जासह एमएसएमईवरही लागू असेल. बँकेनुसार, एका वर्षाच्या एमसीएलआरला ८% आणि ६ महिन्यांच्या एमसीएलआरला ७.८०% घटवले आहे.

फिफाने फुटबॉलपटूंच्या वयाची मर्यादा वाढवली

7 essential measurements to test a FIFA World Cup™ football - The ...

फुटबॉलची जागतिक संघटना फिफाने टोकियो ऑलिम्पिकसाठी फुटबॉलपटूंच्या वयोमर्यादेत वाढ केली आहे. आता ऑलिम्पिकमध्ये १ जानेवारी १९९७ किंवा त्यानंतर जन्मलेले फुटबॉलपटू सहभागी होऊ शकतील. म्हणजे आता २०२१ मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत २४ वर्षांखालील फुटबॉलपटू खेळताना दिसतील. हा निर्णय टोकियो ऑलिम्पिकला एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्याने घेतला. ऑलिम्पिकमध्ये फुटबॉलमध्ये २३ वर्षांखालील खेळाडू सहभागी हाेत असत.

अमेझॉनचा गुगलसारखा गेमिंग प्लॅटफॉर्मर्म

अमेझॉन क्लाऊड आधारित गेमिंग प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. हे गुगलच्या स्टेडिया आणि एनव्हिडियाच्या जीफोर्स नाऊप्रमाणे असेल. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, कंपनी २०२४ पासून क्रुसिबल नावाच्या गेमवर काम करत आहे.

भारतातील कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा लांबणीवर

Untitled 18 3

नोव्हेंबर महिन्यात भारतात होणारी १७ वर्षांखालील वयोगटाची कुमारी ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) करोना विषाणूचे गंभीर संकट लक्षात घेता याबाबतची घोषणा केली.
कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, अहमदाबाद आणि नवी मुंबई या पाच शहरांमध्ये होणार होती. यजमान भारतासह या स्पर्धेसाठी १६ संघ पात्र ठरले होते. १७ वर्षांखालील ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांचा संघ पहिल्यांदाच सहभागी होणार होता. मात्र भारताला आता त्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

५ एप्रिलला संध्याकाळी ९ वाजून ९ मिनिटांनी घरातील लाईट बंद करून दिवे, मेणबत्ती किंवा टॉर्च लावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या ५ एप्रिलला संध्याकाळी ९ वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून ९ मिनिटे दिवे, मेणबत्ती किंवा टॉर्च लावून कोरोना विरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र, यामुळे ९ मिनिटे एकाच वेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य व देश अंधारात जाण्याचा धोका असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्ती केली होती. गेल्या वेळी पंतप्रधानांनी थाळी नादाचे आवाहन केलं होत. त्यावेळी काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांनी एकत्रित येऊन सोशल डीस्टंसिंगचा फज्जा उडवत थाळी नाद केला होता. त्यामुळं यावेळी काही चूक होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने लोकांना केवळ घरातील दिवे बंद करण्याचं आवाहन केलं आहे.

Share This Article