⁠  ⁠

चालू घडामोडी : ०७ डिसेंबर २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs : 07 December 2020

अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड यशस्वी

space station

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड प्रथमच यशस्वी झाली असून त्यामुळे अवकाशवीरांना आता ताज्या मुळ्यांचा आस्वाद घेता येणार आहे.
महिला अवकाशवीर केट रुबीन्स यांनी लागवड केलेल्या बियाण्यांना कोंब फुटून नंतर त्याचे रोप झाले व ३० नोव्हेंबरला मुळे तयार झाले आहेत.
ऐतिहासिक अशी ही घटना मानली जात असून अवकाशस्थानकातील वनस्पती उद्यानात सूक्ष्म गुरुत्वाला मुळ्याची लागवड करण्यात आली होती.
वनस्पती अवकाशात वाढवणे कठीण असते, त्यामुळे एका विशिष्ट कक्षात त्याची लागवड करून त्यावर एलइडीचा प्रकाश सोडला होता. त्याला नियंत्रित पद्धतीने पाणी, पोषके व खते तसेच ऑक्सिजन देण्यात आला.
मुळ्याचे रोप परिपक्व होण्यास केवळ २७ दिवस लागतात त्यामुळे मुळ्याची लागवडीसाठी निवड केली आली होती. ते मुळे २०२१ मध्ये पृथ्वीवर आणले जाणार आहेत.
आतापर्यंत अवकाश स्थानकात कोबी, मोहरी, झिनिया पुष्प वनस्पती, आणि एका रशियन वनस्पतीची लागवड यशस्वी झाली आहे. अवकाशवीरांना ताजे अन्न मिळावे व तेथे वनस्पतींची वाढ कशी होते याचा अभ्यास करणे या हेतूने प्रयोग केले जात आहेत.

अमेरिकेत डीएसीए पुन्हा लागू; न्यायालयाचा आदेश

american flag

डेफर्ड अ‍ॅक्शन फॉर चाइल्डहूड अरायव्हल्स (डीएसीए) हा कायदा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाने २०१७ मध्ये घेतलेला निर्णय अमेरिकी न्यायालयाने रद्दबातल केला असून ओबामा काळातील हा कायदा पुन्हा लागू करण्याचा आदेश दिला आहे.
कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरित व्यक्तींना त्यामुळे दिलासा मिळाला असून त्यात काही भारतीयांचा समावेश आहे.
ट्रम्प प्रशासनाने डीएसीए कायदा २०१७ मध्ये रद्द केला होता, पण त्याला सर्वोच्च न्यायालयाने जूनमध्येही विरोध केला होता.
शुक्रवारी न्यूयॉर्कमधील पूर्व जिल्ह्यचे न्यायाधीश निकोलस गरॉफिस यांनी अंतर्गत सुरक्षा विभागाला असा आदेश दिला,की डीएसीए कायद्यान्वये संबंधिताना दोन वर्षे वाढवून देण्यात यावीत. लोकांचे स्थलांतर अर्ज स्वीकारण्यास सुरूवात करावी. सोमवारपासून मुदतवाढीचे हे अर्ज स्वीकारण्यात यावेत.
याचा अर्थ २०१७ नंतर प्रथमच डीएसीएनुसार पात्र व्यक्तींना प्रथमच अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत अशी अनेक मुले आहेत, त्यांना याचा फायदा होणार आहे. न्यायाधीश गॅरॉफिस यांनी सांगितले,की याबाबत जाहीर सूचना प्रसारित करण्यात येईल. या कायद्यातील काही अतिरिक्त तरतुदी यमेग्य आहेत. डीएसीए हा स्थलांतर धोरणाचा एक भाग असून त्यामुळे अनेक लोक अमेरिकेत राहत आहेत. यात काही मुलांना दोन वर्षांंच्या पुनर्नवीकरणीय व्हिसाच्या आधारे अमेरिकेत आणले जाते व नंतर ते अमेरिकेत काम करण्यास पात्र होतात. डीएसीए पात्र मुलांना ‘ड्रीमर्स’असे म्हणतात.

‘सीरम’प्रमुख पूनावाला ‘एशियन ऑफ दी इयर’

सिंगापूरच्या ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’ या वृत्तपत्राने पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या लसनिर्मिती संस्थेचे प्रमुख अदर पूनावाला यांचा समावेश जगातील सर्वात मोठे लस उत्पादक म्हणून वर्षांतील सहा महत्त्वाच्या आशियाई व्यक्तींमध्ये केला असून त्यांना ‘एशियन ऑफ दी इयर ’ घोषित करण्यात आले आहे.
करोनाप्रतिबंधासाठी संशोधन व लस उत्पादनासाठी एकूण सहा जणांची निवड या वृत्तपत्राने केली आहे.
अदर पूनावाला हे सीरम इन्स्टिटय़ूटचे प्रमुख असून त्यांनी अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केलेल्या कोविड लशीचे उत्पादन सुरू केले आहे.
सन्मान यादीत चीनचे संशोधक झांग योंगझान यांचाही समावेश असून ते व त्यांच्या चमूने सार्स सीओव्ही २ विषाणूची जनुकीय संकेतावली सर्वप्रथम शोधून काढली.
या मानकऱ्यांत चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉ. रुइची मोरिशिटा आणि सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग यांचाही समावेश आहे.
दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांच्या कंपनीने लस तयार करून वितरणाची जबाबदारी घेतली असून त्यांचाही यादीत समावेश आहे. या सर्वाचा उल्लेख ‘व्हायरस बस्टर्स’ असा करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ३० खेळाडूं परत करणार पुरस्कार

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ३० खेळाडूं पुरस्कार परत करण्यासाठी राष्ट्रपतींकडे जाणार आहे. या 30 खेलाडूंमध्ये गुरमैल सिंह, हरमिंदर सिंह, वेटलिफ्टिंग कोच पाल सिंह, करतार सिंह यांचा समावश आहे. हे खेळाडू त्यांना मिळालेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार परत करणार आहेत

mpsc telegram channel

Share This Article