⁠  ⁠

Current Affairs 12 March 2019

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

PadmaAwards : राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण

  • नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कला, क्रीडा, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामिगिरी बजावणाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यावेळी पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. ११२ पैकी ५६ जणांना सोमवारी पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
  • त महाराष्ट्रातील चार मान्यवरांचा समावेश आहे. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हे दाम्पत्याने 34 वर्षांहून अधिक काळ अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी बहुल भागात गोरगरीब व वंचितांना आरोग्यसेवा प्रदान केली आहे.
  • प्रसिध्द नाट्य कलाकार व नाट्य दिग्दर्शक तथा राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक प्रा. वामन केंद्रे यांना कला क्षेत्रातातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रे यांनी ३५ वर्षांपर्यंत नाटयविषयक शिक्षण दिले असून 300 हून अधिक नाटय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

‘रिअल माद्रिद’च्या प्रशिक्षकपदी झिनेदिन झिदानची वापसी

  • फुटबॉल जगतातील अत्यंत नावाजलेल्या ‘रिअल माद्रिद’ या क्लबच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा झिनेदिन झिदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच झिदान यांना संघाच्या सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
  • ‘रिअल माद्रिद’ हा फुटबॉल क्लब १९०२ साली सुरु झाला असून या फुटबॉल क्लबमध्ये गेल्या वर्षभरापासून प्रशिक्षकपदावरुन संभ्रमावस्था दिसून आली होती.
  • झिदान हे प्रसिद्ध फुटबॉलपटू असून २०१६ मध्ये त्यांनी ‘रिअल माद्रिद’च्या प्रशिक्षक पदाची धुरा हाती घेतली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाला १४९ पैकी १०४ सामने जिंकता आले. तर फक्त १६ सामन्यात संघाला पराभव स्विकारावा लागला होता.

बजरंग पुनियासह प्रमुख क्रीडापटू पद्म पुरस्काराने सन्मानित

  • भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांचं वितरण केलं. विविध क्षेत्रातील नामवंत 47 जणांना आज पद्म पुरस्कार देण्यात आला, ज्यामध्ये 9 क्रीडापटूंचाही समावेश होता.
  • कुस्तीपटू बजरंग पुनिया, क्रिकेटर गौतम गंभीर, फुटबॉल कर्णधार सुनिल छेत्री, बास्केटबॉलपटू प्रशांती सिंह, तिरंदाज बोम्बायला देवी, ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली, भारताचा कबड्डी कर्णधार अजय ठाकूर आणि टेबल टेनिसपटू अंचता शरथ कमाल यांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.
  • 1984 साली माऊंट एव्हरेट्सवर जाणाऱ्या पहिल्या महिला भारतीय बनण्याचा मान पटकावणाऱ्या बचेंद्री पाल यांचाही आज सत्कार करण्यात आला. खडतर प्रसंगावर मात करत आपली नवीन ओळख निर्माण करणाऱ्या बचेंद्री यांचा पद्मभुषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.
  • पद्म पुरस्कार विजेच्या क्रीडापटूंची यादी पुढीलप्रमाणे –
  • बचेंद्री पाल (गिर्यारोहण) – पद्मभुषण (उत्तराखंड)
  • बोम्बायला देवी (तिरंदाजी) – मणिपूर
  • प्रशांती सिंह (बास्केटबॉल) – उत्तर प्रदेश
  • गौतम गंभीर (क्रिकेट) – दिल्ली
  • सुनील छेत्री (फुटबॉल) – तेलंगाणा
  • अजय ठाकूर (कबड्डी) – हिमाचल प्रदेश
  • शरथ कमाल (टेबल टेनिस) – तामिळनाडू
  • बजरंग पुनिया (कुस्ती) – हरियाणा
  • हरिका द्रोणावल्ली (बुद्धीबळ) – आंध्र प्रदेश

चंद्रावर पाण्याचे रेणू

  • नासाच्या वैज्ञानिकांनी चंद्रावर पाण्याचे रेणू सापडल्याचा दावा केला आहे. चंद्राच्या प्रकाशित भागात हे पाण्याचे रेणू सापडले आहेत. आगामी चांद्रमोहिमांसाठी या पाण्याचा संशोधनात उपयोग होऊ शकणार आहे.
  • ल्युनर रेकनसान्स ऑर्बिटर (एलआरओ) या अवकाशयानाच्या मदतीने नासाच्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केले आहे. अवकाशयानावर लावलेल्या लायमन अल्फा मॅपिंग प्रोजेक्ट या उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या कणांचा थर टिपला आहे.
  • गेल्या दशकापर्यंत चंद्र कोरडा असून तेथील अंधाऱ्या भागातील विवरात मुख्यतः ध्रुवीय प्रदेशात पाणी असल्याचे वैज्ञानिकांच्या संशोधनात उघड झाले होते. मात्र अलीकडच्या संशोधनात चंद्राच्या पृष्ठभागावर जेथे प्रकाश आहे तेथे पाण्याचे थर शोधून काढले आहेत. पाण्याचे रेणू चंद्रावरील मातीला चिकटलेले आहेत. चंद्र जसा तापत जातो तसे हे पाणी वरच्या भागातून खाली येते.

इथिओपियन एअरलाइन्स अपघात पर्यावरण मंत्रालयाचे सल्लागाराचा समावेश

  • इथोपियन एयरलाइंसच्या विमान अपघातात 6 भारतीयांसह 157 लोकांचा मृत्यू झाला.
  • यामध्ये पर्यावरण मंत्रालयाचे सल्लागार शिखा गर्ग यांचा समावेश होता.
    इथोपियन एअरलाइंसचं बोइंग 737-8 एमएएक्स या नावाचे हे विमान आहे.
  • त्या पर्यावरण आणि वन विभागाशी संबंधित होत्या. नैरोबी येथे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमात (यूएनईपी) भाग घेण्यासाठी त्या निघाल्या होत्या.

Share This Article