भारतीय वंशाच्या अमिका जॉर्जला ब्रिटनचा तिसरा सर्वोच्च एमबीई पुरस्कार
भारतीय वंशाची अमिका जॉर्ज (२१) हिला ब्रिटिश सरकारने शाळांमध्ये फ्री- पीरियड प्रॉडक्टच्या प्रचारासाठी प्रतिष्ठित ‘मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ (एमबीई) पुरस्कार दिला आहे.
आपल्या कामाद्वारे लोकांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा हा तिसरा सर्वाेच्च पुरस्कार आहे.
केंब्रिज विद्यापीठात इतिहासाची विद्यार्थिनी असलेल्या अमिकाचे आई- वडील भारतातील केरळचे आहेत. ती अनेक वर्षांपासून ब्रिटनच्या शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘फ्री पीरियड’ प्रॉडक्ट उपलब्ध करत आहे.
विसा वूडसॅट उपग्रह: जगातील पहिला लाकडी उपग्रह
2021 वर्षाच्या अखेरपर्यंत, युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ही संस्था पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत जगातील पहिला लाकडी उपग्रह पाठविणार आहे. तयार करण्यात आलेल्या “विसा वूडसॅट (WISA WOODSAT)” असे नाव देण्यात आले आहे.
अंतराळयानासाठी प्लायवुडसारख्या लाकडी साहित्याची उपयोगिता तपासण्यासाठी पाहिलांडाच असा प्रयोग केला जात आहे. उष्णता, थंडी, निर्वात आणि किरणोत्सर्ग अश्या भीषण परिस्थितीत लाकडी सामग्री कितपत टिकाव धरून ठेवू शकते याविषयीचा हा प्रयोग आहे.
ठळक बाबी
जगातील पहिला लाकडी उपग्रह न्यूझीलँड देशातून रॉकेट लॅब कंपनीच्या ‘इलेक्ट्रॉन’ प्रक्षेपकाने अंतराळात सोडला जाणार आहे.
हा उपग्रह 10 x 10 x 10 सें.मी. एवढ्या आकाराचा नॅनो श्रेणीतील उपग्रह आहे.
त्याची रचना आणि निर्मिती फिनलँड देशाच्या शास्त्रज्ञांनी केली.
प्लायवुडपासून बनविलेला उपग्रह पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत सुमारे 500-600 कि.मी. उंचीवर ठेवला जाणार आहे.