चालू घडामोडी : २० मे २०२१

सॉफ्टबँकेच्या भारतातील व्यवसाय खरेदीने अदानी समूह सौरऊर्जेत अव्वलsolar

विविध नवउद्यमींमध्ये गुंतवणूक करणाऱ्या जपानी सॉफ्टबँक समूहाचाच भारतातील अपारंपरिक ऊर्जा व्यवसाय अदानी समूहाने खरेदी केला आहे.
३.५ अब्ज डॉलरचा (२५,५०० कोटी रुपये) व्यवहार पूर्ण करत अदानी समूह जगातील सर्वात मोठी सौरऊर्जा कंपनी बनली आहे.
आघाडीचे अब्जाधीश गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील अदानी ग्रीन एनर्जीने सॉफ्टबँकचा भारतातील अपारंपरिक ऊर्जा व्यवसायातील १०० टक्के हिस्सा खरेदी केल्याचे जाहीर केले. सॉफ्टबँकेबरोबर या व्यवसायात भारती समूहही भागीदार होती.
नव्या व्यवहारानंतर अदानी ग्रीन एनर्जीच्या ताफ्यात आता २४.३ गिगावॅटचे ऊर्जा व्यवस्थापन झाले आहे. ८५ लाख घरांसाठीच्या क्षमतेचा हा वीजपुरवठा आहे.
भांडवली बाजारात सूचिबद्ध अदानी ग्रीन एनर्जीने खरेदी केलेली एसबी एनर्जी इंडिया कंपनीत सॉफ्टबँकेचा ८० टक्के तर उर्वरित भारती समूहाचा हिस्सा होता.

पुणे शहरात भारताचे पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र (AEFC)

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) याच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील महारत्त चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (MCCIA) या संस्थेने 15 मे 2021 रोजी पुणे शहरात भारताचे पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र (AEFC) याचे उद्घाटन केले.

ही सुविधा महाराष्ट्र राज्याच्या कृषी व अन्न निर्यातीला चालना देण्यास मदत करेल. कृषी क्षेत्रातील निर्यातदारांसाठी एक-थांबा केंद्र म्हणून काम करणे आणि जागतिक मानकांनुसार प्रदेशातील कृषी निर्यात क्षेत्राला चालना देणे ही उद्दीष्टे ठेवून ही सुविधा उभारण्यात आली आहे.

महारत्त चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (MCCIA) ही स्वातंत्र्यापूर्वी स्थापना झालेल्या उद्योग संघांपैकी एक आहे. याची 16 मार्च 1934 रोजी पुणे येथे स्थापना झाली. महाराष्ट्रातील उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्याकडे या संस्थेचा कल असतो.

पृथ्वीचा संरक्षक थर ४०२ मीटर घटला, भविष्यात बिघडेल उपग्रह संचारFrom Space HD Wallpaper | Background Image | 1920x1080 | ID:287038 -  Wallpaper Abyss

पृथ्वीपासून सुमारे १२ किलोमीटर उंचीवर एक थर आहे, ज्याला स्ट्रॅटोस्फेअर म्हणतात.
सायन्स जर्नल एन्व्हायर्नमेंटल रिसर्च लेटर्समध्ये प्रसिद्ध संशोधनात शास्त्रज्ञांनी सांगितले की, मागील ४० वर्षांत त्यांची उंची ४०२ मीटर कमी झाली आहे
म्हणजे दर दहा वर्षांनी १०० मीटर उंची कमी होत आहे. याचा सर्वाधिक फटका उपग्रहांना बसेल. शास्त्रज्ञांनुसार सन २०८० पर्यंत स्ट्रॅटोस्फेअर १.६० किलोमीटर आणखी पातळ होईल.

Leave a Comment