Current Affairs : 21 December 2020
विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धा : सिम्रनजीत, मनीषाचे सुवर्णयश!

भारतीय बॉक्सिंगपटूंनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत जर्मनीतील कलोन येथे झालेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदांसह एकूण नऊ पदकांची कमाई केली.
अमित पंघालच्या सुवर्णपदकानंतर महिला बॉक्सिंगपटू सिम्रनजीत कौर (६० किलो) आणि मनीषा मौन (५७ किलो) यांनी सुवर्णयश संपादन केले.
मनीषाने भारताच्याच साक्षी चौधरी हिचा ३-२ असा पराभव केला.
सिम्रनजीतने जर्मनीच्या माया क्लिएनहान्स हिच्यावर ४-१ अशी सरशी साधत सुवर्णपदकावर नाव कोरले.
भारताने नऊ पदके मिळवत या स्पर्धेत सर्वसाधारण दुसरे स्थान प्राप्त केले.
पुरुषांमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अमितने (५२ किलो) सुवर्णपदकाची कमाई केली होती.
मल्लखांब खेळाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी चार स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता दिली.
त्यात मल्लखांबसहित, गटका, कलरीपायूट्टू आणि थांत-ता या देशी खेळांचा समावेश आहे.
हरयाणा येथे पुढील वर्षी होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत या चार खेळांचाही आता समावेश असेल.
कलरीपायूट्टू हा खेळ प्रामुख्याने करळमध्ये खेळला जात असून मल्लखांब हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसहित संपूर्ण भारतात खेळला जातो. गटका पंजाबमध्ये खेळला जात असून थांग-ता हा मणिपूर मार्शल-आर्टवर आधारित आहे.
DRDO ने विकसित केली जगातील सर्वोत्तम हॉवित्झर तोफ

स्वदेशी बनावटीची ATAGS हॉवित्झर ही जगातील सर्वोत्तम तोफ आहे.
दूरवरच्या ४८ किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर प्रहार करण्याची या तोफेची क्षमता आहे असे संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजे DRDO च्या वैज्ञानिकाने सांगितले.
“भारतीय लष्करात वापरात असलेली बोफोर्स आणि इस्रायलने जी ATHOS तोफ देण्याची तयारी दाखवलीय, त्यापेक्षा स्वदेशी ATAGS हॉवित्झरमधील सिस्टिम अधिक चांगली आहे”
कारगिल युद्धात पाकिस्तानवरील विजयात बोफोर्स तोफांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ATAGS हॉवित्झर डीआरडीओने विकसित केली आहे.
पुण्यातील विद्यार्थ्यांनी लावला सहा लघुग्रहांचा शोध

पुण्यातील दोन विद्यार्थिनींनी सहा नवीन लघुग्रहांचा शोध लावण्यात यश मिळवले. त्यांनी डॉ. अब्दुल कलाम अवकाश संशोधन संस्थेत एका उपक्रमात सहभाग घेत हे यश मिळवले.
सूर्यमालेतील महत्वाचा घटक असलेल्या लघुग्रहांबद्दल सातत्याने संशोधकांकडून अभ्यास केला जातो.
यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. अशाच उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी 27 नवीन लघुग्रहांचा शोध लावला आहे.
त्यात यामध्ये पुण्यातील विखे पाटील शाळेतील आर्या पुलाटे आणि श्रेया वाघमारे या दोघींनी मंगळ आणि गुरूच्या कक्षेतील सहा नवीन लघुग्रहांचा शोध लावला आहे.
सहावा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव 22 ते 25 डिसेंबर

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचा एक भाग म्हणून भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव आभासी पद्धतीने 22 ते 25 डिसेंबर या काळात आयोजित करण्यात आला आहे.
नागरिकांमध्ये विज्ञानाच्या लोकप्रियतेसाठी “आयआयएसएफआय’ प्रयत्न करीत आहे, आणि प्रतिभावान तरुण विज्ञान चित्रपट निर्माते आणि विज्ञानाबाबत उत्सुक व्यक्तींना आकर्षित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
विज्ञान विषयक गोडी वाढविण्यासाठी, नागरिकांमध्ये विज्ञान विषयक उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी विज्ञान चित्रपट हे एक प्रभावी साधन आहे, या वर्षी 60 देशांमधून 632 विज्ञान माहितीपट, लघुपट, अनिमेशन व्हिडिओ प्राप्त झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा झालेले आणि पारितोषिक विजेते परदेशी, भारतीय विज्ञान, आरोग्य आणि पर्यावरण विषयक चित्रपटांचे ऑनलाइन प्रदर्शन केले जाईल. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक आणि विद्यार्थी चित्रपट निर्मात्यांसाठी एक स्पर्धा आयोजित केली जात आहे.
स्पर्धात्मक श्रेणीत नसलेल्या गटामध्ये भारतासह 23 देशांकडून 75 अर्ज प्राप्त झाले आहेत.