⁠  ⁠

Current Affairs 22 April 2019

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्राची घसरण

  • देशात आपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्राची तिसऱ्या क्रमाकांवर घसरण झाली असली तरी राज्याने एकूण ९ हजार ३०० मेगावॅट
    इतकी वीज निर्मितीची क्षमता गाठली आहे.
  • पाच वर्र्षांपुर्वी अक्षय ऊर्जा निर्मिती केवळ ५ हजार १७२ मेगावॅट होती. ती दुपटीहून वाढली आहे. मात्र शहरी घनकचऱ्यापासून वीज
    निर्मिती करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र अजूनही चाचपडतच आहे.
  • अक्षय ऊर्जा निर्मितीमध्ये देशात कर्नाटक, तामिळनाडूनंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. आधी महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी होते.
  • राज्याची अक्षय ऊर्जा निर्मितीची संभाव्य क्षमता ७४ हजार ५०० मेगावॅटपर्यंत आहे. पूर्ण क्षमता गाठण्यासाठी अजूनही बराच मोठा पल्ला
    गाठावा लागणार आहे.
  • पवनऊर्जा, सौर ऊर्जा, लघु जलविद्युत आणि सहवीजनिर्मिती या क्षेत्रात राज्याने गेल्या काही वर्षांत भरीव कामगिरी केली आहे.
  • सौर ऊर्जा प्रकल्पांच्या बाबतीतही महाराष्ट्र पिछाडीवर आहे. राज्यात सौर ऊर्जा मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. सौर फोटोव्होल्टाईक आणि
    सौर औष्णिक तंत्रज्ञानाच्या आधारे वीज निर्मिती करता येऊ शकते.
  • भारताची नूतनशील ऊर्जा निर्मितीची संभाव्य क्षमता ८ लाख ९६ हजार ६०२ मेगावॅट आहे. राज्यात २००४ मध्ये तर केवळ ७४८ मेगावॅट
    इतकी वीज निर्मिती अक्षय ऊर्जेतून केली जात होती. पवन ऊर्जेपासून वीज निर्मितीसाठी राज्यात ४० ठिकाणे उपयुक्त आहेत.

झिलीने भारताचे पदकांचे खाते उघडले!

  • भारताच्या झिली दालाबेहेराने आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे पदकांचे खाते उघडले. झिलीने ४५ किलो वजनी गटात भारताला रौप्यपदक
    मिळवून दिले. मात्र माजी विश्वविजेत्या मिराबाई चानूचे ४९ किलो वजनी गटातील कांस्यपदक तांत्रिक नियमामुळे थोडक्यात हुकले.
  • कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या झिलीने या स्पर्धेतदेखील दमदार कामगिरीची नोंद केली. झिलीने स्नॅचमध्ये
    ७१ किलो तर क्लिन अँड जर्क प्रकारात ९१ किलो असे एकूण १६२ किलो वजन उचलत दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
  • युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील १६ वर्षीय सुवर्णपदक विजेता भारताचा जेरेमी लालरिनुंगाने त्याच्या ६७ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये १३४
    किलो तर क्लिन अँड जर्कमध्ये १६३ किलो असे एकूण २९७ किलो वजन उचलून दमदार कामगिरीची नोंद केली आहे.

अन्नू, पारुलकडून भारताला दोन पदके

  • भालाफेकपटू अन्नू राणी आणि ५००० मीटरची धावपटू पारुल चौधरी यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावत आशियाई
    अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे पदकांचे खाते उघडले. द्युती चंदने १०० मीटर शर्यतीची राष्ट्रीय विक्रमासह उपांत्य फेरी गाठली.
  • अन्नूने तिच्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा सुमारे दोन मीटर कमी कामगिरीची नोंद करताना ६०.२२ मीटर भालाफेक केली, तर चीनच्या लू
    हुईहुईने सुवर्णपदक मिळवताना तब्बल ६५.८३ मीटर भालाफेक केली. भारताला दुसरे पदक ५००० मीटर शर्यतीत पारुलने मिळवून दिले.
  • पारुलने आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना १५ मिनिटे ३६ सेकंद ०३ शतांश सेकंद अशी वेळ दिली, तर चौथ्या आलेल्या
    नाशिकच्या संजीवनी जाधवने १५ मिनिटे ४१ सेकंद १२ शतांश सेकंद अशी वेळ नोंदवली. या गटात बहारिनच्या मुटिले विनफ्रेड यावी
    आणि बोंटू रेबिटू यांनी सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावले.
  • द्युतीने महिलांच्या १०० मीटर शर्यतीमध्ये स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडत आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली
    आहे. २३ वर्षीय द्युतीने ११.२८ सेकंदांची वेळ देत १०० मीटरची चौथी शर्यत जिंकली. गुवाहाटी येथे गेल्या वर्षी प्रस्थापित केलेला ११.२९
    सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम तिने मोडला.

सेवानिवृत्तीच्या तयारीत भारत पहिल्या स्थानावर..

  • निवृत्तीकरिता तयारी करणाऱ्या १५ देशांच्या यादीत भारत अग्रभागी असून आहे. त्याने याबाबतच्या निर्देशांकात ७.३ टक्क्यांहून अधिक
    गुणांकन मिळविले आहे.
  • ‘एगॉन लाईफ इन्शुरन्स’ या भारतातील डिजिटल इन्शुरन्सच्या संस्थापक कंपनीच्या वतीने सातव्या वार्षिक एगॉन निवृत्तीसज्ज
    सर्वेक्षणाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. या सर्वेक्षणातील ‘एगॉन रिटायरमेंट रेडिनेस इंडेक्स’ (एआरआरआय) मध्ये ७.३ हून अधिक
    गुणांकन मिळविण्यात आले आहे.

महाराष्ट्राला सायबर फॉरेन्सिक प्रयोगशाळा

  • महिलांसंदर्भात वाढते गुन्हे रोखण्यासाठी आणि सायबर गुन्ह्यांचा तपास वेगाने व्हावा यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्ये
    सायबर फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि डीएनए तपासणी सुविधा उपबल्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे.
  • उत्तर प्रदेश, तमिळनाडु, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, मिझोरम, मणिपूर,
    त्रिपुरा आणि नवी दिल्ली येथे या प्रयोगशाळा उभारण्यासाठी १३१.०९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशातील काही
    राज्यांमध्ये पूर्वीपासूनच अशा प्रकारच्या प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

Share This Article