Current Affairs : 22 January 2021
जो बायडन बनले अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष
जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली असून, ते अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायूर्ती सोनिया सोटोमेयर यांनी त्यांना राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ दिली.
तर, भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे.
थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : प्रणॉयचा संघर्षपूर्ण विजय
भारताच्या एच. एस. प्रणॉयने आशियाई विजेत्या जोनाथन ख्रिस्तीला नमवून थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.
दुखापतींमुळे प्रणॉयने आपले सामन्यावरील लक्ष गमावू दिले नाही आणि सव्वा तास चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावरील ख्रिस्तीचा १८-२१, २१-१६, २३-२१ असा पराभव केला.
मागील चार लढतींमध्ये प्रणॉयने प्रथमच इंडोनेशियाच्या सहाव्या मानांकित ख्रिस्तीला पराभूत केले.
७४% टेक कंपन्या १४% पर्यंत हायरिंग वाढवणार
देशातील ७४% टेक कंपन्या २०२१ मध्ये १४% पर्यंत कर्मचारी वाढवणार आहेत. रिक्रुटमेंट सर्व्हिस फर्म मायकेल पेजच्या अहवालात हा दावा केला आहे.
टॅलेंट ट्रेंड्स २०२१ नावाने जारी या अहवालात म्हटले आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग कौशल्य असणाऱ्यांचा जास्त फायदा होईल.
कंपन्यांनी यंदा खेड्यापाड्यांतील प्रतिभावंतांसाठीही आपले पर्याय खुले ठेवले आहेत.