राजेश बन्सल: रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) याचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी
राजेश बन्सल यांची रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचा एक भाग असलेले रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्थिक क्षेत्रात अभिनव पद्धतींचा अवलंब करण्यास पाठिंबा देणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना ऑगस्ट 2020 मध्ये झाली.
राजेश बन्सल : भारताच्या थेट लाभ हस्तांतरण प्रणाली (DBT) आणि E-KYC डिझाइन करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) विषयी
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.
फिल मिकेलसन मेजर किताब जिंकणारा सर्वात वयस्कर
५० वर्षीय फिल मिकेलसन यांनी अमेरिकेच्या या गाेल्फपटूने पीजीए टूर चॅम्पियनशिप जिंकण्याचा पराक्रम गाजवला.
यासह ते अाता या मेजर लीगचे विजेतेपद पटकावणारे सर्वात वयस्कर गाेल्फपटू ठरले अाहेत.
५० वर्षीय मिकेलसन यांनी २०१३ नंतर करिअरमध्ये पहिला मेजर किताब पटकावला. तब्बल सात वर्षांपासून ते यासाठी प्रचंड मेहनत घेत हाेते. अाता किताब जिंकल्यानंतर त्यांना १५.३ काेटींचे बक्षीस देऊन गाैरवण्यात अाले. याच लक्षवेधी कामगिरीच्या बळावर त्यांनी नव्या विक्रमाला गवसणी घातली.
त्यांनी मेजर टायटल जिंंकण्याचा ५३ वर्षे जुना विक्रम ब्रेक केला.
एटीएस प्रमुख जयजीत सिंह ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त
राज्य दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुख जयजीत सिंह यांची ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष ) विनीत अग्रवाल एटीएस प्रमुख तर त्यांच्या जागी अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील तरतुदीनुसार भारतीय पोलीस सेवेतील अपर पोलीस महासंचालक श्रेणीतील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
लिले संघाला फ्रेंच लीग-१ फुटबॉलचे जेतेपद
लिले संघाने गतविजेत्या पॅरिस सेंट-जर्मेनला एका गुणाने मागे टाकत फ्रेंच लीग-१ फुटबॉलचे जेतेपद पटकावले.
पॅरिस सेंट जर्मेनने ब्रेस्ट संघावर २-० अशी मात करत लिलेवर दडपण आणले.
पण लिलेने अँगर्सविरुद्ध २-१ असा विजय मिळवत तब्बल १० वर्षांनंतर फ्रेंच लीग-१चे चौथे जेतेपद पटकावले.
कॅनडाचा आघाडीवीर जोनाथन डेव्हिडने १०व्या मिनिटाला लिलेचे खाते खोलल्यानंतर बुराक यिल्माझ याने ४५व्या मिनिटाला संघाची आघाडी २-० अशी वाढवली.
अँगर्सकडून भरपाई वेळेत अँजेलो फुल्गिनी याने गोल केला. तरीही लिलेले जेतेपदावर नाव कोरले.
स्टार फुटबॉलपटू रॉबर्ट लेवँडोव्हस्कीने मोडला ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम
पोलंडच्या फुटबॉल संघाचा कर्णधार रॉबर्ट लेवँडोव्हस्कीने मोठा पराक्रम केला आहे.
जर्मन लीग बुंडेस्लिगामधील एका मोसमात लेवँडोव्हस्की सर्वाधिक गोल नोंदवणारा खेळाडू ठरला. बुंडेस्लिगामध्ये बायर्न म्युनिककडून खेळणाऱ्या लेवँडोव्हस्कीने या मोसमात लीगमधील ४१वा गोल नोंदवला.
३२ वर्षीय लेवँडोव्हस्कीने तब्बल ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित काढला. त्याने आपल्याच क्लबच्या गेरार्ड म्युलर यांचा विक्रम मोडला.
ऑग्सबर्गविरुद्धच्या सामन्यात बायर्न म्युनिकने ५-२ असा विजय मिळवला. यात त्याने ९०व्या मिनिटाला गोल करत हा विक्रम नोंदवला. म्युलर यांनी १९७१-७२च्या बुंडेस्लिगामधील हंगामात ४० गोल केले होते.