⁠  ⁠

चालू घडामोडी : २६ जून २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Current Affairs 26 June 2020

भारतात आता खासगी कंपन्याही करु शकतात उपग्रहासह रॉकेट बांधणी

isro
  • इस्रोने अवकाश संशोधन क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले आहे. खासगी क्षेत्राला आता उपग्रह निर्मितीसह रॉकेट बांधणी तसेच उपग्रह लाँचिंगच्या सेवाही सुरु करता येऊ शकतात. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी ही माहिती दिली.
  • खासगी क्षेत्राला सुद्धा आता इस्रोच्या मोहिमांचा भाग होता येईल असे त्यांनी सांगितले. अवकाश मोहिमा आणि संशोधनामध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. खासगी क्षेत्राला परवानगी दिली म्हणून इस्रो आपले काम कमी करणार नाही. इस्रोच्या अवकाश संशोधन आणि मानवी मोहिमा सुरुच राहतील असे सिवन यांनी स्पष्ट केले.
  • लॉकडाउनमुळे अवकाश मोहिमांवर परिणाम
  • करोना व्हायरसमुळे मानवी अवकाश मोहिम, चंद्रयान-३ य़ा प्रकल्पांना विलंब होणार आहे. त्याशिवाय या वर्षातील १० अवकाश मोहिमांवर परिणाम झाल्याचे सांगितले. लॉकडाउनचा आमच्या मोहिमांवर काय परिणाम झालाय त्याचा इस्रो आढावा घेईल असे त्यांनी सांगितले.

अखेर संजिता चानूला अर्जुन पुरस्कार मिळणार

Untitled 25 16

उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणातील आरोप आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने मागे घेतल्यानंतर आता राष्ट्रकु ल स्पर्धेत देशाला दोन सुवर्णपदके मिळवून देणारी वेटलिफ्टर संजिता चानू हिला २०१८ सालच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
२०१८ सालच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालानुसार संजिताला अर्जुन पुरस्कार देण्यात येईल, असे क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले. संजितावरील उत्तेजकांचे आरोप मागे घेण्यात आले तर तिला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात यावे, असा आदेश २०१८मध्येच दिल्ली उच्च न्यायालयाने दिला होता.
‘‘संजितावरील उत्तेजकाचे आरोप मागे घेण्यात आल्यामुळे तिला आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल,’’ असे क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
२०१७मध्ये अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळण्यात आल्यानंतर संजिताने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मे २०१८मध्ये संजिता उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळली होती. त्याच वर्षी संजितावरील उत्तेजकाची सुनावणी झाल्यानंतर तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. वेटलिफ्टिंग महासंघाने गेल्या महिन्यातच तिच्याविरुद्ध पुरावे नसल्याने सर्व आरोप मागे घेतले होते.

Share This Article