Current Affairs : 27 February 2021
हिमा दास आसामच्या पोलीस उपअधीक्षक पदी
स्टार स्प्रिंटर हिमा दासला आसाम पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले.
जुलै 2018 मध्ये फिनलंड येथे झालेल्या 20 वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.
अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिने 51.46 सेकंदांमध्ये हे अंतर पार करत विक्रम केला.
2018 मध्ये हिमाने जकार्ता (इंडोनेशिया) येथे भरलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक मिळवलं. यात तिने 50.79 सेकंदात शर्यत पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम केला.
याच स्पर्धेतील मिश्र रिले स्पर्धेत (4 X 400 मीटर) हिमा दास, एम. आर. पुवम्मा, मुहम्मद अनस, राजीव आरोकीया यांच्या संघाने रौप्य पदक पटकावलं. याशिवाय हिमा दास, एम.आर. पुवम्मा, सरीता गायकवाड, व्ही.के. विस्मया यांच्या संघाने सुवर्णपदक मिळवले.
महागाईचा सहिष्णू दर २ ते ६ टक्के!
रिझव्र्ह बँक कायद्यात २०१६ मध्ये संसदेने सुधारणा करत महागाईचा दर ४ टक्के (अधिक उणे २ टक्के) या पट्टय़ात राखण्याची जबाबदारी रिझव्र्ह बँकेवर सोपविण्यात आली.
या सुधारणेत दर पाच वर्षांंनी पुनर्आढावा घेण्याची तरतूद असल्याने १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२६ या पाच वषार्ंसाठी देशातील मध्यम मुदतीच्या महागाईचे उद्दीष्टाचे पुनरवलोकन करणे गरजेचे होते.
रिझव्र्ह बँकेच्या शुक्रवारी प्रकाशित झालेल्या ‘चलन आणि वित्त २०२१ अहवालात महागाईचा सहिष्णू दर २ ते ६ टक्के राखण्याची शिफारस केली आहे.
महागाईच्या दराला लक्ष्य करण्याचे धोरण स्वीकारल्यानंतर चलन वाढीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या पाच वषार्ंत महागाईचा दर ३.८ ते ९.१ टक्के या पट्टय़ात राहिला असून सरासरी दर ४.३ टक्के होता. किरकोळ किंमतीत स्थैर्य राखण्यासाठी सांख्यिकीय चौकटीची गरज असून ४ टक्के +/— २ टक्के हा सहिष्णुता पट्टा पुढील पाच वर्षांंसाठी योग्य असेल, असे रिझव्र्ह बँकेने या अहवालात नमूद केले आहे.
तिसऱ्या तिमाहीत जीडीपी विकास दर ०.४ टक्के
|देशाचा विकास दर २०२०-२१ च्या पहिल्या दोन तिमाहीत नकारात्मक राहिल्यानंतर सकारात्मक झोनमध्ये आला आहे. डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत विकास दर ०.४% राहिला. यासोबत भारत मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये विकास दर सकारात्मक क्षेत्रात आलेला चीननंतरचा दुसरा देश ठरला आहे.
देशात विकास दर पहिल्या तिमाहीत उणे २३.९% आणि दुसऱ्या तिमाहीत उणे ७.५% होता. तिसऱ्या तिमाहीत जीडीपीचा(सकल राष्ट्रीय उत्पादन) आकार ३६.२२ लाख कोटी रुपयांचा राहिला.
हा गेल्या वित्त वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या ३६.०८ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ०.४% जास्त आहे. तिसऱ्या तिमाहीत वृद्धी दर शून्यावर आल्यानंतर चालू वित्त वर्षात वृद्धी दर उणे ८% राहील, असा सरकारचा अंदाज आहे.