⁠  ⁠

Current Affairs – 27 October 2016

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 8 Min Read
8 Min Read

देश-विदेश

# अमेरिकी लेखक पॉल बेट्टी यांना ‘बुकर’ पुरस्कार
अमेरिकेतील वर्ग व वंशभेद व्यवस्थेवर टीका करणाऱ्या पॉल बेट्टी यांच्या ‘द सेलआउट’ या कादंबरीस बुकर साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकी व्यक्तीला बुकर पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांची कादंबरी अतिशय धक्कादायक, अनपेक्षित, इतकीच गमतीदार व विनोदीही आहे. त्यात अफ्रो-अमेरिकन व्यक्तीची कहाणी असून तो त्याची ओळख ठसवून देण्याचा प्रयत्न करीत असतो. लॉसएंजल्सच्या शेजारी असलेल्या भागात घडलेल्या या कहाणीत पुन्हा गुलामगिरी व वर्गवाद निर्माण झाल्याचे दाखवून ही कथा लिहण्यात आली आहे. लंडनच्या गिल्डहॉल येथे झालेल्या कार्यक्रमात लेखक बेट्टी यांना ५० हजार पौंडांचा पुरस्कार देण्यात आला. येथे लेखक बेटी यांनी मी लेखनाचा तिरस्कार करतो असे सांगितले. हे पुस्तक लिहिणे कठीण होते, ते वाचायलाही कठीण आहे. अमेरिकी राजकारणाच्या पाश्र्वभूमीवर त्यात बोचरी टीका व नर्म विनोदही आहे. त्यांच्या लेखनाची तुलना मार्क ट्वेन व जोनाथन स्विफ्ट यांच्याशी केली आहे.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

# एनएसजी सदस्यत्वासाठी भारताची दावेदारी बळकट
भारताला अणुपुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळण्यासाठी न्यूझीलंडची भूमिका सकारात्मक असल्याचे पंतप्रधान जॉन की यांनी बुधवारी स्पष्ट केले. यामुळे भारताची एनएसजी सदस्यत्वाची दावेदारी अधिक बळकट झाली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉन की यांच्यात बुधवारी चर्चा झाली. त्यात व्यापार, संरक्षण आणि सुरक्षा या क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला. उभय देशांच्या पंतप्रधानांमध्ये विविध मुद्दय़ांवर सकारात्मक चर्चा झाली. दुहेरी करआकारणी टाळण्यासंबंधीच्या करारासोबतच उभय देशांनी तीन करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. परस्पर सहकार्याद्वारे दहशतवादाविरोधात लढण्याचा निर्धारही मोदी आणि जॉन की यांनी या वेळी केला. एनएसजीमध्ये भारताला सदस्यत्व मिळण्यासाठी न्यूझीलंडने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी जॉन की यांचे आभार मानले. त्यावर भारताच्या एनएसजी सदस्यत्वाबाबतचा निर्णय लवकर होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जॉन की यांनी स्पष्ट केले.

# लैंगिक समानतेच्याबाबतीत १४४ देशांमध्ये भारत ८७ वा
आगामी काळात भारत जागतिक महासत्ता होणार किंवा जगाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन बनणार, याची चर्चा रंगली असतानाच सामाजिक निकषांच्याबाबतीत भारताला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, हे दाखविणारा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. लैंगिक समानतेबाबत नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक आकडेवारीनुसार १४४ देशांच्या यादीत भारत चक्क ८७ व्या क्रमांकावर असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे स्त्री-पुरूषांच्या शिक्षण आणि वेतनातील फरक बऱ्याच अंशी मिटविण्यात भारताला यश आल्यामुळे यंदा या क्रमवारीत भारताचे स्थान २१ क्रमाकांनी वधारले आहे. जागतिक आर्थिक मंचाने (डब्ल्यूईएफ) केलेल्या या सर्वेक्षणात भारताचा शेजारी पाकिस्तान मात्र शेवटहून दुसऱ्या स्थानावर असून येमेन अखेरच्या स्थानावर आहे.

# धनोत्रयोदशीला पहिला ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’
दिवाळीतील ‘धनोत्रयोदशी’ हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय अखेर केंद्रीय आयुष मंत्रालयाने घेतला असून पहिला आयुर्वेद दिन २८ ऑक्टोबरला मधुमेहाचे जनजागरण करून साजरा होणार आहे. गत १५ ते २० वर्षांपासून याविषयी आयुर्वेद क्षेत्रातील जाणकारांकडून मागणी होत होती. इतर शाखांचा ‘डॉक्टर डे’ मान्यताप्राप्त आहे, पण भारतीय उपचार पध्दती असलेल्या आयुर्वेदाचा कुठलाही दिनविशेष नव्हता. या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर आयुषचा स्वतंत्र प्रभाग असणारे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी कोणत्या दिवशी आयुर्वेद दिन साजरा करावा म्हणून मते जाणून घेतली. काहींनी २७ फेब्रुवारी हा दिवस सुचविला. १९२० साली याच दिवशी नागपूरच्या कांॅग्रेस अधिवेशनात महात्मा गांधी यांनी स्वतंत्र भारताची आरोग्यपध्दती आयुर्वेद ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती, पण बहुसंख्य आयुर्वेदप्रेमींनी दिवाळीतील ‘धनोत्रयोदशी’ या दिवसाचाच आग्रह धरल्यावर तो मंजूर करण्यात आला.

राज्य

# ३५ लेखकांना राज्य वाङमय पुरस्कार
प्रख्यात लेखिका, कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर, नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी, लेखिका प्रतिमा इंगोले, रमेश पतंगे, पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ, लघुकथा लेखक प्रकाश बाळ जोशी, राजीव तांबे यांच्यासह ३५ लेखक, साहित्यकांना महाराष्ट्र शासनाचा २०१५ या वर्षाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप जास्तीत जास्त १ लाख रूपये रोख आणि किमान ५० हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. यंदा एकूण २४ लेखकांना १ लाख रूपये रोख रकमेचे तर ८ लेखकांना ५० हजार रूपये रोख पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

क्रीडा

# मलेशियावरील विजयासह भारत अव्वल
रुपिंदर पाल सिंगने केलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने मलेशियाचा २-१ असा पराभव केला आणि आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत साखळी गटात आघाडीचे स्थान मिळवले आहे. भारताचा हा सलग चौथा विजय आहे. मलेशियाविरुद्धच्या चुरशीच्या लढतीत भारताने पूर्वार्धात १-१ अशी बरोबरी साधली. सामन्याच्या १२व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा उपयोग करीत रुपिंदरने पहिला गोल केला. परंतु त्यानंतर सहा मिनिटांनी मलेशियाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत राही रहीमने गोल करीत सामन्यात उत्सुकता निर्माण केली. उत्तरार्धात सामन्याच्या ५७व्या मिनिटाला रुपिंदरनेच पेनल्टी कॉर्नरद्वारे उत्कृष्ट गोल केला. याच गोलच्या आधारे भारताने सामना जिंकला.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

# भारतीय संघासह अश्विन अव्वल स्थानी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत भारताने अव्वल स्थान कायम राखले आहे. याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडू आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा अव्वल फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन अग्रस्थानी कायम आहे. कसोटी संघांच्या क्रमवारीत भारतीय संघ ११५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. भारतानंतर पाकिस्तान (१११) आणि ऑस्ट्रेलिया (१०८) हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळी मिळवण्याचा विक्रम करणाऱ्या अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मलिकेत नेत्रदीपक कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर अश्विनने ९०० गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. कसोटी गोलंदाजांच्या यादीत अश्विननंतर द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन (८७८) दुसऱ्या व इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (८६१) तिसऱ्या स्थानावर आहे. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा (८०५) सातव्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत जडेजा २९१ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

# मेस्सी, रोनाल्डोवर मात करीत ग्रिएझमन सर्वोत्तम खेळाडू
ला लिगा फुटबॉल स्पध्रेतील पुरस्कारांमध्ये लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची चालत आलेली मक्तेदारी अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या अँटोइने ग्रिएझमनने मोडली. ला लिगा २०१५-१६च्या मोसमातील सर्वोत्तम खेळाडूंच्या शर्यतीत मेस्सी व रोनाल्डो यांच्यावर मात करून ग्रिएझमनने बाजी मारली. अ‍ॅटलेटिकोच्या डिएगो सिमोन यांनी सर्वोत्तम प्रशिक्षकाचा, तर बार्सिलोनाच्या लुईस सुआरेझने सर्वोत्तम युरोपीय देशाबाहेरील खेळाडूचा पुरस्कार पटकावला. या पुरस्कारांमध्ये अ‍ॅटलेटिकोचा दबदबा दिसला. सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून जॅन ओब्लॅक, बचावपटू म्हणून डिएगो गॉडीन या अ‍ॅटलेटिकोच्या खेळाडूंना गौरविण्यात आले आणि प्रेक्षकपसंतीचा पुरस्कार ग्रिएझमनने पटकावला. रिअल माद्रिदच्या लुका मॉड्रिकला सर्वोत्तम मध्यरक्षकाचा पुरस्कार देण्यात आला.

अर्थव्यवस्था

# फ्लिपकार्टचे सीएफओ संजय बावेजांचा राजीनामा
नवी दिल्ली: भारतातील प्रमुख ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमधील वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र कायम आहे. आता कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) संजय बावेजा यांनी आपला राजीनामा सादर केला आहे. फ्लिपकार्टतर्फे या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. टाटा कम्युनिकेशन्सच्या सीएफओची भूमिका बजावलेल्या बावेजा यांनी दोन वर्षांपुर्वी फ्लिपकार्टमध्ये प्रवेश केला होता. जुलै महिन्यात कंपनीचे कायदेशीर हेड रजिंदर शर्मा यांनीदेखील 10 महिन्यांमध्येच राजीनामा सादर केला आहे. बावेजा यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण व त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. फ्लिपकार्टचे हेड ऑफ कॅटेगरी मॅनेजमेंट कल्याण कृष्णमुर्ती हे सीएफओची भूमिका तात्पुरती पार पाडू शकतात. याआधीही त्यांनी ही कामगिरी बजावली आहे.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

TAGGED:
Share This Article