देश-विदेश
जपानचे शास्त्रज्ञ योशिनोरी ओहसुमी नोबेलचे मानकरीCurrent Affairs in Marathi
# जपानचे ख्यातनाम शास्त्रज्ञ योशिनोरी ओहसुमी यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पेशींमधील विघटन आणि पुनर्रचनेविषयी संशोधन केल्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. योशिनोरी ओहसुमी यांचा जन्म १९४५ मध्ये जपानमधील फुकूओका येथे झाला. १९७४ मध्ये त्यांनी टोकियो विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केले. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील विद्यापीठात त्यांनी तीन वर्ष काम केल्यावर ते पुन्हा टोकियोत परतले आणि १९८८ मध्ये त्यांनी संशोधन गटाची स्थापना केली. २००९ पासून ते टोकियोतील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
महाराष्ट्र
मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी गावाचे नामांतर
# मराठा आरक्षण, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल या प्रमुख मागण्यासांठी सध्या राज्यभरात काढण्यात येत असलेल्या मराठा मोर्च्यांचा सूर टिपेला पोहचला आहे. या मोर्च्यांमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता असताना आता गावपातळीवर याचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील गुंडेवाडी या गावाने ग्रामसभेत ठराव मांडून गावाचे नावच बदलले आहे. ग्रामसभेत मंजुर झालेल्या ठरावानुसार गुंडेवाडीचे नाव मराठानगर असे करण्यात आले आहे.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विद्याधर करंदीकर यांचे निधनCurrent Affairs in Marathi
# ज्येष्ठ साहित्यिक, कवी, दंतचिकित्सक डॉ. विद्याधर सीताराम करंदीकर (५८) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला जिल्हा मुकला आहे. डॉ. करंदीकर हे मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी होते. साहित्य संस्कृतीतील व्यासंगी अभ्यासक, साहित्य संस्कृतीचे संदर्भकोश अशीच त्यांची ओळख होती. १९९३ मध्ये त्यांच्या ‘चंदनी धुक्यामध्ये’ या कवितासंग्रहातील ‘किनारा’ कवितेचा सहावीच्या पाठय़पुस्तकात समावेश झाला होता. प्रसिद्ध साहित्यिक दया पवार यांनी त्यांच्या कवितेची निवड केली होती. डॉ. करंदीकर बाल साहित्यिक म्हणूनही राज्यात ओळखले जात होते. त्यांची बाल साहित्याची विविध पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या ‘पहिला माझा नंबर’ या बालनाटय़ाला राज्य शासनाचा ‘राम गणेश गडकरी’ पुरस्कारही प्राप्त झाला होता. कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्राच्या विविध भागांत सादर करण्यात आले होते.
क्रीडा
कसोटी क्रमवारीत भारत पुन्हा अव्वल
# भारतीय संघाने कोलकाता कसोटीत चौथ्या दिवशी १७८ धावांनी विजय प्राप्त करून तीन कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली आहे. भारतीय संघाने या मालिका विजयासह आतंरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान प्राप्त केले आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होण्याची भारतीय संघाची ही चौथी वेळ आहे. दुसऱया डावात भारतीय संघाकडून मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर भुवनेश्वर कुमारने एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली.
अर्थव्यवस्था
दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या घटली- जागतिक बँक
# न्यूयॉर्क : जागतिक अर्थव्यवस्थेच्या चिंताजनक परिस्थितीनंतरदेखील जगभरातील दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येत 10 कोटींची घट झाली आहे, अशी माहिती जागतिक बँकेकडून देण्यात आली. बँकेच्या नव्या आकडेवारीनुसार, 2013 साली तब्बल 76.7 कोटी लोकांचे प्रतिदिन उत्पन्न 1.90 डॉलरएवढे होते. अगोदरच्या वर्षातन (2012) हा आकडा 88.1 कोटी होता. विशेषतः आशियातील लोकांच्या उत्पन्नात अधिक वाढ झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची बिकट परिस्थिती असूनसुद्धा दारिद्र्य नष्ट करीत सर्व देशांची समृद्धीकडे सुरु असलेली वाटचाल उल्लेखनीय आहे, असे मत जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम याँग किम यांनी व्यक्त केले.
घरखरेदीसाठी पीएफची रक्कम तारण ठेवण्याची मुभाCurrent Affairs in Marathi
# आगामी आर्थिक वर्षापासून नोकरदारांना त्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) घरखरेदीसाठी तारण ठेवता येणार आहे. तसेच पीएफच्या खात्यातून घराचे हप्ते फेडण्याचीही सुविधाही उपलब्ध होणार आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ही सुविधा आपल्या चार कोटी सदस्यांना पुढील आर्थिक वर्षापासून ही सुविधा पुरवणार आहे.
आम्ही भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांसाठीच्या गृह योजनेसंदर्भात काम करत आहोत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात पीएफची रक्कम ऑनलाईन काढून घेण्याची सोय उपलब्ध झाल्यानंतर नव्या योजनेचा प्रारंभ करता येईल, अशी माहिती केंद्रीय भविष्यनिर्वाह निधी आयुक्त व्ही.पी. रॉय यांनी दिली.
६५ पैकी १३ हजार कोटी एकट्या हैदराबादमधून प्राप्त
# अघोषित उत्पन्न जाहीर करण्याच्या केंद्र सरकारच्या अभय योजनेत सर्वाधिक काळा पैसा असलेल्या शहरात हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली आघाडीवर आहेत. या योजनेत देशभरातून ६५ हजार कोटी रूपये काळा पैसा समोर आला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत काळा पैसा जाहीर करण्याची अंतिम मुदत होती. यातील निम्म्याहून अधिक रक्कम या तीन शहरातून आल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्वाधिक काळा पैसा हा हैदराबादमध्ये असून येथून १३ हजार कोटी रूपयांच्या अघोषित उत्पन्नाचा खुलासा झाला आहे. मुंबई आणि दिल्लीतून आठ-आठ हजार कोटी रूपयांची संपत्ती उजेडात आली आहे. ही सर्व रक्कम एकूण रक्कमेच्या ३० टक्के इतकी आहे. सर्वाधिक कमी अघोषित उत्पन्न हे केरळ आणि ओडिशा या राज्यातून झाले आहे. येथून ५०० कोटींहून कमी रक्कम मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]