⁠  ⁠

Current Affairs – 7 October 2018

Rajat Bhole
By Rajat Bhole 3 Min Read
3 Min Read
RBI

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

  • देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगाणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम शनिवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला. यांपैकी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम या ४ राज्यांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
  • दरम्यान, मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये २८ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर राजस्थान आणि तेलंगणामध्ये ७ डिसेंबर रोजी मतदान होईल. तसेच छत्तीसगढमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार असून पहिल्या टप्प्यात १२ नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पाचही राज्यांतील निवडणुकांचा निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.
  • तसेच या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापरही केला जाणार आहे.

september mpsc ebook

रिझव्‍‌र्ह बँकेची अनपेक्षित दरस्थिरता

  • एकंदर बाजार अपेक्षांच्या विपरीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीने ‘रेपो दरा’त कोणताही बदल न करता, तो सध्याच्या ६.५० टक्के पातळीवर स्थिर ठेवण्याचा शुक्रवारी निर्णय घेऊन अनपेक्षित धक्का दिला. शुक्रवारी संपलेल्या पतधोरण समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीत पाच विरुद्ध एक अशा बहुमताने घेतल्या गेलेल्या निर्णयाने भांडवली बाजारात ‘सेन्सेक्स’मध्ये ८०० अंशांची घसरगुंडी आणि रुपयाच्या मूल्याला डॉलरमागे ७४ खाली भोवळ आणणारा भयानक परिणाम साधला.
  • पतधोरण समितीच्या बैठकीनंतर, पत्रकार परिषदेत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी हे ‘जैसे थे’ पतधोरण जाहीर केले. पतधोरण समितीच्या सहा सदस्यांपैकी केवळ चेतन घाटे यांनी रेपो दरात वाढीच्या बाजूने कौल दिला. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील भरधाव वाढ आणि चलनवाढीच्या अंगाने देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याच्या संभाव्य झळा पाहता, मध्यवर्ती बँकेचा धोरण पवित्रा तटस्थतेकडून ‘कठोरते’कडे सरकल्याचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी स्पष्ट केले. ‘यापुढे रेपो दरात कपातीच्या शक्यतेला वावच उरलेला नाही’ असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सूचित केले.
  • तथापि, मध्यवर्ती बँकेकडून किमान पाव ते अर्धा टक्क्यांनी व्याजदर वाढविले जातील अशी अपेक्षा एकंदरीत अर्थविश्लेषक करीत होते. कमजोर रुपया आणि तेलातील भडका याच्या दुहेरी परिणामाने महागाई आवाक्याबाहेरील जाईल आणि त्यावर नियंत्रणासाठी व्याजदर वाढविणे रिझव्‍‌र्ह बँकेला भागच पडेल, असा सार्वत्रिक मतप्रवाह होता. प्रत्यक्षात रिझव्‍‌र्ह बँकेने चालू वित्तवर्षांच्या उत्तरार्धात, ऑक्टोबर ते मार्च दरम्यान किरकोळ किमतींवर आधारित महागाई दर पूर्वअंदाजापेक्षा अधिक कमाल ४.५ टक्क्यांपर्यंत भडकण्याचे भाकीत वर्तविले असले तरी, तिने रेपो दर आहे त्या पातळीवर कायम ठेवणेच तूर्त पसंत केले. आगामी काही महिन्यांत महागाई दरातील वाढीच्या जोखमीसंबंधाने करडी नजर ठेवावी लागेल, असे गव्हर्नरांनी स्पष्ट केले.
  • जागतिक व्यापार-युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या निर्यातविषयक दृष्टिकोन धूसर बनला असल्याचे नमूद करतानाच, देशाच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा अंदाज चालू वर्षांसाठी ७.४ टक्के पातळीवर रिझव्‍‌र्ह बँकेने कायम ठेवला आहे.

add header new

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Share This Article