⁠  ⁠

चालू घडामोडी – ८ ऑगस्ट २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 4 Min Read
4 Min Read

देश-विदेश

कायमस्वरूपी अधिकार देण्याची निवडणूक आयोगाची मागणी
# राजकीय जाहिरातींना पायबंद घालण्यासाठी घटनेत नमूद केलेल्या अधिकारांचा वापर करून देण्यात यावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. आगामी काळातील विधानसभा निवडणुका बघता वृत्तपत्रांतून राजकीय प्रचार होण्याची शक्यता आहे. त्याला पायबंद घालता यावा यासाठी लोकप्रतिनिधी कायद्यात ( Representation of the People Act ) सुधारणा कराव्यात. याद्वारे निवडणूक आयोगाला कायमस्वरूपी कायदेशीर अधिकार मिळावेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

भारतात वाघांची संख्या वाढूनही घटत्या अधिवासाची चिंता
# भारतात व इतरत्र वाघांची संख्या वाढत असली, तरी अजूनही परिस्थिती पूर्णपणे सुधारलेली नाही, असे एका जागतिक अहवालात म्हटले आहे. जंगलांचे कमी होणारे प्रमाण व त्यातून जाणारे मोटारमार्ग तसेच त्यांच्या अधिवासात उभ्या केल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा यामुळे वाघांची संख्या वाढण्यात अडचणी येत आहेत. ‘फीअर्स बट फ्रॅजाइल को एक्झिस्टन्स इन अ चेंजिंग वल्र्ड’ या अहवालात ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ या संस्थेने म्हटले आहे, की मानव व वन्यजीव संघर्ष हा भारतातील तराई प्रांतातील संघर्ष नेहमीचा आहे. नेपाळमध्येही तसेच घडते आहे. अधिक विकसित अशा वाघ संवर्धन कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आगामी काळात वाघांची संख्या कमी होऊ शकते कारण जमिनीवर पाम तेलासाठी पामच्या झाडांची लागवड होत आहे. मोटरमार्ग व पायाभूत सुविधा वाघांच्या अधिवासात उभारण्यात आल्या आहेत, त्यामुळे वाघांचे अधिवास सुरक्षित राहिले नाहीत. संवर्धन कार्यक्रमात वन्यजीव व मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

अर्थव्यवस्था

जीएसटी १ एप्रिलपासून लागू करण्याचे प्रयत्न
# सरकार १ एप्रिलपासून जीएसटी लागू करील व ती कालमर्यादा पाळण्यात अडचणी असल्या, तरी त्या दूर करण्यात येतील. कराचा दर, करातून सूट द्यावयाच्या वस्तू असे काही मुद्दे अजून प्रलंबित आहेत, असे महसूल सचिव हसमुख अढिया यांनी सांगितले. अर्थमंत्री, २९ राज्यांचे प्रतिनिधी यांचे जीएसटी मंडळ केंद्र व राज्यांच्या करांपैकी कुठले कर व उपकर जीएसटी करात मिळवायचे याचा विचार करतील, असे त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अढिया म्हणाले, की जीएसटी मंडळ केंद्र व राज्य सरकारांना स्थानिक स्वराज्य संस्था, केंद्र व राज्य यांनी लावलेले उपकर व अधिभार याबाबत सूचना करील.

क्रीडा

अभिनव बिंद्राचा अंतिम फेरीत प्रवेश
# रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला अद्याप एकही पदक जिंकता आलेले नसले तरी नेमबाज गगन नारंग आणि अभिनव बिंद्रा यांच्याकडून पदकाची आशा भारताला आहे. पात्रता फेरीत अभिनवने चांगली कामगिरी केली असून क्रमवारीत ७ वे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अभिनवने एकूण ६२५.७ गुणांची कमाई केली. गगन नारंगने मात्र यंदा निराशा केली. गगन नारंगला प्राथमिक फेरीतूनच स्पर्धेच्या बाहेर पडावे लागले आहे.

मायकेल फेल्प्सने घडवला इतिहास
# अमेरिकेचा अव्वल जलतरणपटू मायकेल फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये नवा विक्रम केला आहे. मायकेल फेल्प्सचा समावेश असलेल्या अमेरिकेच्या संघाने ४x१०० मी. फ्री-स्टाईल रिले प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. मायकेल फेल्प्सचे हे ऑलिम्पिकमधील आजवरचे १९ वे सुवर्ण पदक ठरले. तब्बल १९ सुवर्णपदकांसह २३ पदकांची विक्रमी कामगिरी करणारा फेल्प्स हा जगातील पहिला जलतरणपटू ठरला आहे.

जिम्नॅस्टिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी दीपा कर्माकर पहिली भारतीय महिला
# भारताच्या दीपा कर्माकरने सोमवारी रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक वॉल्टची अंतिम फेरी गाठत नवा इतिहास रचला. दीपा कर्माकर ही ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. दीपाने पात्रता फेरीत १४.८५० गुण मिळवत आठवे स्थान पटकावले. मात्र, अनइव्हन बार, बॅलेंसिंग बीम आणि फ्लोअर एक्सरसाईज या अन्य तीन प्रकारांत चमकदार कामगिरी करण्यात तिला अपयश आले. दीपाने अनइव्हन बारमध्ये ११.६६६, बॅलन्सिंग बिममध्ये १२.८६६आणि फ्लोअर एक्सरसाईजमध्ये १२.०३३ गुणांची कमाई केली. अंतिम फेरीनंतर दीपा कर्माकर सहावे स्थान मिळवेल असे वाटत असतानाच कॅनेडियन प्रतिस्पर्ध्याच्या अफलातून सादरीकरणामुळे तिला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

TAGGED:
Share This Article