⁠  ⁠

Current Affairs 2 February 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 4 Min Read
4 Min Read

1) बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) कुलगुरुपदीमराठी माणूस

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बी. ए. चोपडे यांची प्रसिद्ध बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चोपडे यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक असलेले चोपडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी ४ जून २०१४ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ दीड वर्षच राहिलेला असताना त्यांना ही संधी मिळाली आहे.

२) फिडेल कॅस्ट्रो यांच्या मुलाची आत्महत्या

क्युबाचे क्रांतिकारी नेते दिवंगत फिडल कॅस्ट्रो यांचा सर्वात मोठा मुलगा फिडेल एंजल कॅस्ट्रो डियाज बलार्ट यांनी गुरुवारी हवाना येथे आत्महत्या केली. ६८ वर्षीय डियाज बलार्ट यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचं क्युबन मीडियानं स्पष्ट केलं आहे. फिडेल कॅस्ट्रोप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या डियाज बलार्ट यांना लोक प्रेमानं ‘फिडेलिटो’ नावाने संबोधायचे. सोव्हियत युनियनमध्ये शिक्षण घेतलेले डियाज बलार्ट हे न्यूक्लिअर फिजिसिस्ट होते. त्यांनी १९८० ते १९९२ या काळात क्युबाच्या राष्ट्रीय अण्वस्त्र कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते. त्यांना गेल्या काही महिन्यापासून नैराश्य आले होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. गुरुवारी सकाळी त्यांनी अखेर आत्महत्या केली, अशी माहिती क्युबाच्या ‘क्युबाडिबेट’ या न्यूज संस्थेने दिली.

३) मेरी कोमला सुवर्ण

भारताची माजी जगज्जेती बॉक्सर मेरी कोमने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले मेरीने आपल्या ४८ किलो वजनी गटाच्या झुंजीत फिलिपिनो जॉसी गबुकोवर ४-१ अशी मात करत सुवर्णपदक पटकावले. मात्र भारताला सुवर्णपदकाची बोहनी करून दिली ती पविलाओ बसुमतरीने. या आसामी बॉक्सरने महिलांच्या ६४ किलो वजनी गटामध्ये जागतिक व आशियाई स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या थायलंडच्या सुदापोर्नसीसाँडीची कडवी झुंज ३-२ अशी मोडून काढली. सध्या पविलाओ कामगिरीच्या जोरावर सातत्याने राष्ट्रीय शिबीरात स्थान मिळवत असून २०१५मध्ये तिने सर्बिया येथे पार पडलेल्या नेशन कपमध्ये सुवर्णपदकही पटकावले आहे. आसामचीच लव्हलिना बोरर्गोहेनने वेल्टरवेटमध्ये (६९ किलो) सुवर्णपदकाची कमाई केली. तिने भारताच्याच पूजावर मात केली. मात्र धक्कादायक पराभव सहन करावा लागला तो सरितादेवीला (६० किलो). रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक पटकावणारी फिनलँडची मिरा पोटकेननने सरिताला नमवले.

४) काँग्रेसचे लाेकसभेतील संख्याबळ दोनने वाढले

राजस्थानात दोन लोकसभा आणि एक विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवून भाजपला धक्का दिला. विजयामुळे काँग्रेसचे लाेकसभेतील संख्याबळ ४६ वरून ४८ तर भाजपचे २७७ वरून २७५ झाले आहे. अलवरमध्ये काँग्रेसचे कर्णसिंह यादव यांनी भाजप उमेदवार जसवंत यादव यांना दीड लाखाहून अधिक मतांनी हरवले. जसवंत सध्या वसुंधरा राजे मंत्रिमडळात मंत्री आहेत. अजमेरमध्ये काँग्रेसचे रघू शर्मा यांनी भाजपचे रामस्वरूप यांचा, तर मांडलगड विधानसभेत काँग्रेसचे विवेक धाकड यांनी भाजपचे शक्तीसिंह हाडा यांचा १३ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. सावरलाल जाट यांच्या निधनामुळे अजमेर, खा. महंत चांदनाथ यांच्या निधनामुळे अलवर व आमदार कीर्तिकुमारी यांच्या निधनामुळे मांडलगड जागा रिक्त झाल्या होत्या. ९ महिन्यांनी राजस्थानात विधानसभा निवडणूक होत आहे.

५) पुण्याची श्रुती श्रीखंडे ‘सीडीएस’ परीक्षेत देशात पहिली

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची कन्या असून तिने पुण्यातून लॉमध्ये शिक्षण घेतले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेसचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून तोंडी आणि लेखी परीक्षेचा यात समावेश असतो. चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) तिला प्रवेश मिळणार आहे. सीडीएसमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत हे दोन टप्पे असले तरी शारीरिक क्षमता हा तितकाच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे श्रुतीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे. एप्रिल २०१८ पासून तिच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिली आली आहे. तिचे शालेय शिक्षण आर्मी पब्लिक स्कूलमधून ाझाले आहे.

MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Share This Article