⁠  ⁠

जागतिक उद्योजकता शिखर परिषद २०१७ (जीईएस)

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 2 Min Read
2 Min Read

जगभरातील कल्पक उद्योजक, गुंतवणुकदार यांना एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणजेच जागतिक उद्योजकता शिखर परिषद २०१७ (जीईएस) हैदराबाद येथे २८ ते ३० नोव्हेंबर या तीन दिवसात होत आहे. हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय समन्वय केंद्रात या जागतिक उद्योजकता संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार्‍या या संमेलनाचा ’वुमेन फर्स्ट, प्रॉस्पेरिटी फॉर ऑल’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे. या संमेलनात १२७ देशातील १,२०० पेक्षा जास्त उद्योजक सहभागी झाले आहेत. यात भारताकडून ४०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. अमेरीकेच्या ३५० प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची सल्लागार मुलगी इव्हांका करत आहे. अमेरिकी विदेशी मंत्रालय तसेच नीती आयोगाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आलेल्या संमेलनासाठी देशातील सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजी हब असलेल्या हैदराबाद शहराची निवड करण्यात आली आहे. पूर्ण संमेलनाचे चार उद्योग क्षेत्रात विभाजन करण्यात आले आहे. यात ऊर्जा आणि इन्फ्रास्ट्रक्चर, आरोग्यसेवा आणि जीवविज्ञान, अर्थविषयक तंत्रज्ञान आणि डिजिटल अर्थव्यवस्था तसेच मीडिया आणि एंटरटेन्मेंट यांचा समावेश आहे. यात सहभागी होणार्‍या सुमारे १,२०० उद्योजकांपैकी सर्वात कमी वयाचा उद्योजक १३ वर्षांचा, तर सर्वात वयोवृद्ध उद्योजक ८४ वर्षांचे आहेत. अमेरिकेतील ३८ राज्यांचे ३५० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यात सर्वाधिक भारतीय वंशाचे आहेत. ५२.५ टक्के प्रतिनिधी महिला असून हा जीईएसचा विक्रम आहे.माजी अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या प्रयत्नाने २०१० मध्ये वॉशिंग्टनमध्ये पहिले जीईएस संमेलन झाले. तुर्की, संयुक्त अरब अमिराती, मलेशिया, मोरक्को केनियामध्येही संमेलन झाले आहे. दक्षिण आशियातील भारत हा पहिला देश आहे. संमेलनातमार्गदर्शन करणार्‍यांमध्ये मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज, टेनिस खेळाडू सानिया मिर्झा, अभिनेत्री अदिती राव, आयसीआयसीआय बँकेच्या एमडी-सीईओ चंदा कोचर, डीआरडीओच्या संचालक टेसी थॉमस आणि चेरी ब्लेयर यांचा समावेश आहे.

Share This Article