⁠  ⁠

Mission STI – अभ्यास कसा करावा..?

Rajat Bhole
By Rajat Bhole 3 Min Read
3 Min Read

परीक्षेला आता अवघे ७५ दिवस शिल्लक असताना अभ्यास कसा करावा असा प्रश्न आपणासमोर असेल तर त्याचे मी एकाच उत्तर देईल – full proof planning ने…

असा अभ्यास करावा तरच आपणास यश मिळू शकेल या मागील काही करणे मी मागील संवादामध्ये दिलेले आहेत. अगदीच पहिल्यांदा हा लेख आपण वाचत असाल तर याआधी हे दोन लेख नक्की वाचा.

Mission STI – 2015
Mission STI – परीक्षा स्वरूप- विषयानुसार

यानंतर आपण लगेच मूळ विषयाकडे जाऊयात.. आधीच सांगितल्या प्रमाणे ५७+ स्कोर हे आपण लक्ष समोर ठेवणार आहोत. त्यानुसार विचार केला असता काही संभाव्य मार्क्सचे गणित आपल्या समोर मी मांडेल…

जर आपण एकूण —
९० प्रश्न सोडवले आणि यातील ६३ बरोबर आणि २७ चुकलेत तर आपला स्कोर – ५६.५ पर्यंत येईल.
८५ प्रश्न सोडवले आणि यातील ६१ बरोबर आणि २४ चुकलेत तर आपला स्कोर – ५५ पर्यंत येईल. 
८० प्रश्न सोडवले आणि यातील ६० बरोबर आणि २० चुकलेत तरीही आपला स्कोर – ५५ पर्यंत येईल.
७५ प्रश्न सोडवले आणि यातील ५९ बरोबर आणि १६  चुकलेत तरीही आपला स्कोर – ५५ पर्यंत येईल.

यावरून २ निष्कर्ष समोर येतात —
१. मुळात ७०-८० मार्क्स च्या perfect अभ्यासावर आपण परीक्षा उत्तीर्ण करू शकतो. 
२.  ६० मार्क्स जर आपण confirm असू तर त्या उपर समतोल प्रमाणात आपण रिस्क घेण्यास सक्षम असतो. 

आता ८० मार्क्स म्हणजे एक विषय वगळायला scope आहे. तो पूर्ण पणे न वगळता कमी लक्ष द्या ( हा सल्ला फक्त कमी दिवसात जास्त आभ्यास करणाऱ्यांसाठी आहे.)
यात कोणता विषय वगळावा हा वयक्तिक प्रश्न आहे. पण याचा फायदा यामुळे आपल्याला प्रत्येक विषयामागे जास्त वेळ अधिकीचा मिळेल.  ही खूप विचार पूर्वक निवडलेली strategy आहे. Don’t worry..!

आता वेळेचे नियोजन करूयात – आपल्याला ७५ दिवस आहेत हातात आणि ७ विषय. — (आधीच ठरवल्या प्रमाणे एक विषय वगळला तर ६.)


१६ नोव्हेंबर – २६ नोव्हेंबर – १ला विषय 
२७ नोव्हेंबर – ७ डिसेंबर – २रा विषय 
८  डिसेंबर – १८ डिसेंबर – ३रा विषय 
१९ डिसेंबर – २९ डिसेंबर – ४था विषय 
३० डिसेंबर – १० जानेवारी – ५ वा विषय
(३१ डिसेंबर ला सुटी नक्की घ्या)
११ जानेवारी – १६ जानेवारी ( ६ वा – वागळलेला विषय )

१७ जानेवारी – ३१ जानेवारी – current + practice. + प्रश्नपत्रिका सोडवा. 


– यात प्रत्येक विषयासाठी १० दिवस + १ दिवस revision साठी असा अवधी आहे.
– आपल्या पद्धती प्रमाणे अभ्यास करा लिहिण्यात कमी वेळ घालवा.
– दिवसाचे व्यवस्तीत नियोजन असू द्या. जास्तीत जास्त अभ्यासावर लक्ष द्या.
– Target सेट करा आणि ते पूर्ण करा

आम्ही आपणास current आणि प्रश्नपत्रिका यांसाठी वेळेवेळी मार्गदर्शन करूच…त्याच प्रमाणे विषय वार मार्गदर्शन देखील करू..

तेव्हा आमची अभ्यास strategy करून पहा नक्की फायदा होईल.
शुभेच्छा व काही प्रश्न किंव्हा काही समस्या असतील तर नक्की comments करा…
लेखा बद्दल देखील प्रतिक्रिया द्या आपल्या सूचना नाक्की विचारात घेऊ…

Share This Article