⁠  ⁠

चालू घडामोडी : २४ नोव्हेंबर २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs : 24 November 2020

मध्य प्रदेशात स्थापन झाली देशातील पहिली गो कॅबिनेट

मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारने गो कॅबिनेटची स्थापना केले आहे.
राज्यात गायींची सुरक्षा आणि कल्याणासाठी आता काऊ सेस लावण्याचा देखील विचार होत आहे गो कॅबिनेट गठीत करणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे.
सन २०१८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवराजसिंह चौहान यांनी गायींसाठी एका वेगळ्या मंत्रालयाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती

रशियन टेनिसपटू डॅनियल मेदवेदेव पहिल्यांदाच एटीपी फायनल्सचा चॅम्पियन

Untitled 29 2

रशियन टेनिसपटू डॅनियल मेदवेदेवने एटीपी फायनल्समध्ये विक्रमाला गवसणी घातली. त्याने या स्पर्धेचा किताब जिंकण्याचा पराक्रम गाजवला.
यासह ताे पहिल्यांदाच एटीपी फायनल्समध्ये चॅम्पियन ठरला.
यंदाच्या सत्रातील शेवटच्या या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत चाैथ्या स्थानावर असलेल्या या खेळाडूने फायनलमध्ये यूएस चॅम्पियन डाेमिनिक थिएमवर मात केली.
त्याने ४-६, ७-६, ६-४ अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. यासाठी त्याने दाेन तास ४३ मिनिटे शर्थीची झंुज दिली. त्यामुळे ही या स्पर्धेच्या इतिहासातील तिसरी मॅरेथाॅन फायनल ठरली. हीच फायनल जिंकून त्याने करिअरमध्ये सर्वात माेठा किताब पटकावला.

इस्रोच्या शुक्रयान मोहिमेतील वैज्ञानिक उपकरणांसाठी परदेशी प्रस्ताव

Untitled 22 3

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या शुक्रयान मोहिमेसमवेत वैज्ञानिक उपकरणे पाठवण्यासाठी परदेशातून अनेक प्रस्ताव आले असून त्यात वीस प्रस्तावांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
यात फ्रान्सच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. याशिवाय रशिया, स्वीडन व जर्मनी या देशांचेही प्रस्ताव असून ते देशही भारताच्या शुक्रयानासमवेत संशोधनासाठी वैज्ञानिक उपकरणे पाठवण्यास तयार आहेत.
स्वीडिश इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस फिजिक्सचे एक उपकरणही शुक्रयान मोहिमेबरोबर पाठवले जाऊ शकते.
पृथ्वीसारख्याच प्रक्रियेतून शुक्राची निर्मिती ४.५ अब्ज वर्षांपूर्वी झाली होती, त्यामुळे पृथ्वी व शुक्र यांच्यात आकार, वस्तुमान, घनता, गुरुत्व याबाबत काही साम्यस्थळे आहेत.
शुक्र ग्रह पृथ्वीपेक्षा सूर्याच्या ३० टक्के अधिक जवळ आहे.
१९६० पासून शुक्राचे संशोधन सुरू करण्यात आले असून इतर देशांनी तेथे आर्बिटर, लँडर पाठवले होते.
भारताच्या शुक्रयान मोहिमेत २५०० किलो वैज्ञानिक यंत्रसामुग्री पाठवली जाऊ शकते. हे यान पाठवण्यासाठी जीएसएलव्ही एमके २ अग्निबाण वापरला जाईल.
तो १७५ किलो वजनाचा असून शुक्रयान शुक्राभोवती ५०० बाय ६०००० कि.मी. या कक्षेत फिरत राहील. नंतर हे अंतर कमी करून यान शुक्रोच्या आणखी नजीकच्या कक्षेत आणले जाईल.
इस्रोने जून २०२३ मध्ये शुक्रावर यान पाठवण्याचे नियोजन केले आहे.
२०२३ मध्ये जर शुक्रयान मोहीम पार पडली नाही तर नंतरची संधी २०२४ किंवा २०२६ मध्ये आहे. दर १९ महिन्यांनी शुक्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ येतो, त्यामुळे तो काळ शुक्रावर यान पाठवण्यासाठी योग्य मानला जातो.

आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचे निधन

पंतप्रधान मोदी आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांनी वाहिली तरुण गोगोई यांना श्रद्धांजली

आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचे २३ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
तरुण गोगोई हे ईशान्य भारतातले काँग्रेसचे मोठे नेते होते. ते सहा वेळा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले होते.
सलग तीन वेळा मुख्यमंत्री होऊन १५ वर्षं सत्तेत असणारे ते या राज्याचे एकमेव नेते ठरले.
सुरुवातीला आसामच्या जोरहाट मतदारसंघातून ते निवडणूक लढवत असत. त्यानंतर कालिबोरमधून ते निवडून आले. सध्या कालियाबोर मतदारसंघातून त्यांचा मुलगा गौरव गोगोई खासदार म्हणून निवडून आले आहेत.

mpsc telegram channel

Share This Article