---Advertisement---

MPSC ने सिलॅबस बदलला नाही तर केवळ अपडेट केलाय ? अधिक वाचा..

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

MPSC Syllabus Change Update Explained.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा (एमपीएससी) मुख्य परीक्षेच्या सहापैकी चार विषयांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. यात मराठी आणि इंग्रजी हे दोन भाषा विषय वगळण्यात आले आहेत. मात्र हा सिलॅबस पूर्णतः बदललेला नसून काही घटकांमध्ये बदल करून सिलॅबस अपडेट करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. सुधारित अभ्यासक्रम संकेतस्थळावर देण्यात आल्याची माहिती एमपीएससीने दिली आहे.

राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी या दोन भाषा विषयांसोबत सामान्य अध्ययन-१, सामान्य अध्ययन-२, सामान्य अध्ययन-३, सामान्य अध्ययन-४ हे विषय असतात. भाषेचे विषय १०० गुणांसाठी असतात तर इतर विषय १५० गुणांसाठी असतात. एकूण ८०० गुणांची परीक्षा असते.

सुधारित अभ्यासक्रम हा संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून पुढील परीक्षेसाठी असणार आहे. असे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच भाषा विषयातील सुधारित अभ्यासक्रम संकेतस्थळावर देण्यात आला असून इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम अंतिम आणि अधिकृत मानला जाईल असेही नमूद करण्यात आले आहे.

MPSC GS Paper 1 – मध्ये इतिहास आणि भूगोलाचा समावेश होतो. याच पेपरमध्ये सर्वाधिक बदल करण्यात आले आहेत. Old Syllabus – अभ्यासक्रमानुसार समाज सुधारक हा घटक इतिहासात स्पष्टपणे नमूद नव्हता. मात्र त्यावर नेहमीच प्रश्न विचारले जात असत. आता बदल करण्यात आलेल्याला नवीन अभ्यासक्रमात हा घटक ठळकपणे नमूद करण्यात आला आहे. भूगोलामध्ये आर्थिक व्यवसाय हा घटक नव्याने समाविष्ट आहे.

MPSC GS Paper 2 – हा मुख्यत: राज्यव्यवस्था या घटकाशी संबंधित आहे. यामध्ये आयोगाने भारतीय प्रशासनाचा उगम, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व कल्याण अधिनियम 2007 यासारख्या घटकांचा नव्याने समावेश केला आहे. लोकप्रशासन हा जो घटक आतापर्यंत MPSC अभ्यासक्रमामध्ये नव्हता तो आता नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.

MPSC GS Paper 3 – जो मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क या घटकांशी संबंधित आहे. यामध्ये जास्त बदल केलेला नसून फक्त व्यावसायिक शिक्षण – या घटकांमध्ये कौशल्य विकास या घटकाला अधोरेखित केलेले आहे व सोबत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 समावेश केला आहे.

MPSC GS Paper 4 – हा अर्थव्यवस्था व विज्ञान व तंत्रज्ञान या घटकाशी संबंधित आहे. फक्त नवीन अभ्यासक्रम शिस्तबद्ध पद्धतीने यात मांडण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना संदर्भ पुस्तके किंवा संकल्पना कुठल्या कराव्या यासंबंधी योग्य मार्गदर्शन मिळेल.

या बदलाचं वैशिष्ट्य म्हणजे आयोगाने मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम विस्तृत, व्यापक आणि वर्तमान परिस्थिला सुसंगत केला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेत एकूण सहा पेपर असतात, त्यापैकी मराठी व इंग्रजी यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. जे सामान्य अध्ययनाचे चार पेपर आहेत त्यामध्ये आयोगाने थोडा व्यापक बदल केला आहे.

अपडेट केलेल्या अभ्यासक्रमातीलच प्रश्न याआधी विचारण्यात आले होते त्यामुळे बदललेल्या अभ्यासक्रमामुळे फारसा फरक पडणार नाही अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.