इंदूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीगीर सुशील कुमारने सुवर्णपदक जिंकले. त्याच्या दोन प्रतिस्पर्ध्यांनी आपल्यापेक्षा सरस अशा या खेळाडूला सन्मान देण्यासाठी लढतीतून माघार घेतली. महिलांमध्ये ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक व गीता फोगाट यांनीही आपापल्या वजनी गटात सहज सुवर्णपदके जिंकली. गीताने ५९ किलो वजनी गटात सरिताला ८-४ असे नमविले तर साक्षीने आपल्या अंतिम सामन्यात ६२ किलो वजनी गटात आपली प्रतिस्पर्धी खेळाडू पूजा तोमरला १०-० असे सहज पराभूत केले. रेल्वेतून खेळत असलेल्या उत्कर्ष काळेने ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. त्याने आपल्या लढतींत प्रवीण कुमार, विकी, महेक चौधरी, महिपती आणि अंतिम फेरीत रविकुमार यांना नमविले.
LATEST Post
रेल्वेत विविध पदांच्या 5236 जागांसाठी मेगाभरती; 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी..
Published On: ऑक्टोबर 15, 2026
CRPF मार्फत 521 जागांसाठी भरती ; 10वी, 12वी उत्तीर्णांना संधी
Published On: ऑक्टोबर 13, 2026
भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 3548 जागांसाठी भरती ; पदवीधरांना मोठी संधी
Published On: ऑक्टोबर 12, 2026
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. विविध पदांसाठी मोठी पदभरती
Published On: ऑक्टोबर 12, 2026
भारतीय तटरक्षक दलात विविध पदांच्या 365+जागांसाठी भरती ; 10वी-12वी उत्तीर्णांना संधी
Published On: ऑक्टोबर 7, 2026
कॅनरा बँकेत 3500 जागांसाठी मेगा भरती; पदवीधरांना मोठी संधी
Published On: सप्टेंबर 29, 2026
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत पदवीधरांना नोकरीची संधी; 225 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 29, 2026
MPSC परीक्षार्थींसाठी मोठी बातमी; राज्यसेवेसह ३ मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या
Published On: सप्टेंबर 29, 2026















