⁠  ⁠

अडथळे आले तर खचले नाहीतर हिंमतीने अधिकारी बनले….वाचा अनुराग यांच्या यशाची कहाणी !

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

UPSC IAS Success Story जगभरातील बरेच विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी अर्ज करतात. यातील काही उत्तीर्ण होतात तर काहींना अपयश येतं. यात सातत्य आणि मेहनत गरजेची असते. असेच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे IAS अधिकारी अनुराग कुमार.

अनुराग कुमार मूळचा बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील आहे. त्यांनी शाळेत असताना आठवीपर्यंत हिंदी माध्यमात शिक्षण घेतले. त्यानंतर ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेले. यावेळी अनुराग कुमार यांना परिस्थितीशीसामना करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. तरी अनुराग कुमारने त्याच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी खूप मेहनत केली आणि त्यात ९० टक्के गुण मिळवले. मात्र, बारावीत त्याला ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. यानंतर त्यांनी दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश निश्चित केला. आयएएस अधिकारी अनुराग कुमार यांच्यासाठी पदवीच्या वर्षांमध्ये सर्वात जास्त शिकायला मिळाले. कुमार पदवी काळात बऱ्याच विषयात अनुत्तीर्ण झाले. पण त्यांनी शिक्षणाचा प्रवास थांबू दिला नाही. त्याने कठोर परिश्रम केले, समर्पितपणे अभ्यास केला आणि शेवटी परीक्षा उत्तीर्ण झाली.

पोस्ट ग्रॅज्युएशनच्या काळातच IAS अनुराग कुमार यांनी युपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. पदव्युत्तर पूर्ण केल्यानंतर त्यांनी पूर्ण झोकून आणि मेहनतीने युपीएससीची तयारी सुरू केली. या प्रयत्नांना यश देखील आले.अनुराग कुमार २०१७ मध्ये त्याच्या पहिल्याच प्रयत्नात AIR ६७७ सह UPSC साठी पात्र ठरला. कुमार या परीक्षेतील त्याच्या रँकवर समाधानी नव्हता. त्यामुळे अनुरागने पुन्हा तयारी सुरू केली. त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात, त्याने २००८च्या UPSC CSE परीक्षेत AIR ४८ वा क्रमांक मिळवला. अनुराग कुमार सध्या बेतिया जिल्ह्यात सहाय्यक जिल्हा अधिकारी म्हणून रूजू आहेत.

Share This Article